डोअर टू डोअर भाजीपाला विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:15 PM2020-03-24T17:15:58+5:302020-03-24T17:16:22+5:30

पांडाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यात शेतातील भाजीपाला खराब होण्यापेक्षा प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरती जाऊन डोअर टू डोअर विक्री करण्यात येत आहे.

 Door-to-door vegetable sales | डोअर टू डोअर भाजीपाला विक्री

डोअर टू डोअर भाजीपाला विक्री

Next

पांडाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यात शेतातील भाजीपाला खराब होण्यापेक्षा प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरती जाऊन डोअर टू डोअर विक्री करण्यात येत आहे. दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अहिवंतवाडी गटात आदिवासी बहुल भागात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे पीक घेतले जाते. त्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, मुळे, वांगी, भोपळा अशा पालेभाज्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती, परंतु आता भाजी काढण्यास तयार झाल्यानंतर त्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील सर्वच म्हणजे खेडगाव, वणी, कोशिंबे, भनवड, चौसाळे, ननाशी, जानोरी, मोहाडी, लखमापूर, हे आठवडे बाजार बंद झाल्यामुळे आपला तयार झालेला भाजीपाला शेतकरी प्रत्येक घरी जाऊन विक्री करीत आहे.

Web Title:  Door-to-door vegetable sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक