मोदी यांच्या सभेसाठी नाशकात डझनभर मंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:39 AM2019-09-19T00:39:18+5:302019-09-19T00:39:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.१९) महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी होणाऱ्या सभेसाठी राज्य आणि केंद्रातील डझनभर मंत्री हजेरी लावणार आहेत. या मंत्र्यांचे दौरे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, सकाळी सर्व मंत्र्यांचे आगमन होणार आहे.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.१९) महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी होणाऱ्या सभेसाठी राज्य आणि केंद्रातील डझनभर मंत्री हजेरी लावणार आहेत. या मंत्र्यांचे दौरे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, सकाळी सर्व मंत्र्यांचे आगमन होणार आहे.
सकाळी ८.३० वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, सकाळी १० वाजता केंद्रीय ग्राहक व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सकाळी ६ वाजता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सकाळी ९ वाजता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, सकाळी ८ वाजता वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंट्टीवार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री राम शिंदे, सकाळी ९ वाजता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे आगमन होणार आहे. सभेसाठी येणारे मंत्री सकाळी शासकीय विश्रामगृह येथे येणार असून, तेथून ते तपोवनातील सभास्थळी पोहोचणार आहेत. राम शिंदे हे जामखेड येथून हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये पोहोचणार असून पंकजा मुंडे, विनोद तावडे हे ओझर विमानतळावर उतरणार आहेत.