मनमाड : शेतीला मुबलक पाणी व शेतमालाला योग्य भाव याबरोबरच सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या सुधारणा झाल्या नाही तर शेतकरी आत्महत्या करतील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले विधान आजही तंतोतंत लागू पडत आहे. डॉ. आंबेडकर हेच खºया अर्थाने शेतकºयांचे नेते असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याजयंतीनिमित्त आयोजित भीमोत्सव २०१८ कार्यक्रमात व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंबेडकरी शिक्षक मंचचे प्रा. डॉ. के. वाय. इंगळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून हिरामण संसारे, राजेंद्र जाधव, शरद केदारे उपस्थित होते. एडवर्ड शिंदे, सचिन मुंढे, रवि गायकवाड यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेच्या १२७ प्रतींचे मान्यवरांना वाटप करण्यात आले. यावेळी भीमोत्सवाचे राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, नीलेश वाघ, संजय कटारे, अमीन शेख, संजय भालेराव, सतीश केदारे, संतोष आहिरे, संजय कांबळे, पी. आर. निळे, प्रकाश बोधक, हबीब शेख, बाळू मोरे, तुषार आहिरे, मनोज ठोंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.कसेल त्याची जमीन कायदाडॉ. आंबेडकरांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. ते आमदार झाल्यावर पहिल्यांदा त्यांनी मुंबई विधिमंडळावर शेतकºयांचा मोर्चा काढला होता. शेतकºयांची परिषद घेतली. कोकणातील खोटी पद्धत बंद पाडली. कसेल त्याची जमीन हा कायदा आणला. आयुष्यभर त्यांनी दलित समाजासह शेतकºयांसाठी लढा दिला. आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात ते शेतकºयांचे प्रश्न अग्रक्र माने समाविष्ट करत. त्या काळात भारतातील नव्वद टक्के जनता शेतीवर जगत होती. डॉ आंबेडकर हे शेतकºयांचे शेतीचे प्रश्न हिरिरीने मांडत असत. डॉ. आंबेडकर हे खºया अर्थाने शेतकºयांचे नेते असल्याचे प्रतिपादन हरी नरके यांनी केले.
डॉ. आंबेडकर हेच शेतकऱ्यांचे नेते : हरी नरके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:16 AM