चांदवड तालुक्यात ठिकठिकाणी डॉ. भारती पवारांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:21 AM2021-08-18T04:21:13+5:302021-08-18T04:21:13+5:30
यावेळी आशीर्वाद यात्रेचे वडाळीभोई, नमोकार तीर्थ मालसाणो, मंगरुळ येथील मतदार व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. भर पावसाळ्यातही ...
यावेळी आशीर्वाद यात्रेचे वडाळीभोई, नमोकार तीर्थ मालसाणो, मंगरुळ येथील मतदार व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. भर पावसाळ्यातही भाजप नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आशीर्वाद यात्रेत उघड्या रथावर मंत्री डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, भूषण कासलीवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे व भाजपचे नेते विराजमान झाले होते. यावेळी भर पावसातही कार्यकर्त्यांनी डॉ. भारती पवार यांचे स्वागत केले.
मतदारांचा विश्वास सार्थ ठरवीन, केंद्रातील सरकार शेतकरीहिताचेच !
चांदवड - देशाच्या विकासाबरोबरच नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये लक्ष घालून शेतकरी, मतदार, सर्वांसाठी काम करेन, तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची वहिनी म्हणून कधीही विकासकामासाठी आवाज द्या, मी सदैव प्रयत्नशील राहीन, असा विश्वास केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सेलहॉलमध्ये जाहीर सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले.
यावेळी चांदवड तालुक्यातील विविध संस्था, व्यक्ती यांच्या वतीने डॉ. भारती पवार यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन प्रा. सुनील बच्छाव यांनी केले. व्यासपीठावर आमदार डॉ. राहुल आहेर, किशोर काळकर, लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, शंकरराव वाघ, प्रकाश गेडाम, रवी अनासपुरे, नंदकुमार खैरनार, डॉ. आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, प्रशांत ठाकरे, मनोज शिंदे, जगन्नाथ राऊत, विक्रम मरकड, पंढरीनाथ खताळ, सुनील शेलार, बाळासाहेब वाघ, बाळासाहेब माळी, विलास ढोमसे, निवृत्ती घुले, ॲड. शांताराम भवर, डॉ. उमेश काळे, अशोक भोसले, सभापती पुष्पा धाकराव, डॉ. नितीन गांगुर्डे, देवीदास आहेर, विजय धाकराव, गीता झाल्टे, मुकेश आहेर, बाळा पाडवी, महेश खंदारे, आदींसह जिल्ह्यातील भाजप नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
(१७ चांदवड)
चांदवड येथे डॉ. भारती पवार यांच्या नागरी सत्कारप्रसंगी डॉ. राहुल आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, मनोज शिंदे, केदा आहेर, प्रशांत ठाकरे, मुकेश आहेर, देवीदास आहेर, अंकुर कासलीवाल, नेते व कार्यकर्ते.
170821\17nsk_41_17082021_13.jpg
चांदवड तालुक्यात ठिकठिकाणी डॉ.भारती पवारांचे स्वागत