खमताणे : बागलाण तालुक्यात खमताणे, मुंजवाड, तिळवण, कंधाणे नवेगाव परिसरात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. या भागातील तब्बल दोन हजार जनावरे चारा-पाण्याअभावी भुकेचे बळी ठरण्याच्या मार्गावर आहेत, तर काही जनावरे दगावली आहेत. त्यामुळे या मुक्या जनावरांसाठी त्वरित चारा छावण्या आणि पाण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.गायी, म्हशीना चारण्यासाठी मुबलक रान राहिले नाही. पावसाचे प्रमाण कमी होत चालल्याने चाराटंचाई जाणवु लागली आहे. जनावरांच्या किमतीही वाढल्या. घराघरांत फीज आल्याने बाजारात दुधाच्या पिशव्या मिळु लागल्याने दुध व्यवसायाकडे शेतकऱ्यांने पाठ फिरवल्यामुळे दुधटंचाई जाणवु लागली आहेत.मार्च महिन्यातच उन्हाच्या तीव्रतेने ४० अंशाचा पारा गाठल्याने या भागातील पाण्याचे स्रोत आटुन तीव्र पाणीटंचाईसह जनावरांच्या वैरणाचा प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. बागलाण तालुक्यात येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती पशुपालन आहे. बहूंताश कुटुंब हे रोजंदारी शेतमजुरीसाठी बाहेरगावी जात असल्याने दिवसा संपूर्ण गावे निर्मनुष्य होते. पावसाळी शेत पिकावर अवलंबून असलेले येथील जनतेकडे मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून या भागातील पर्जन्यमान घटल्याने या वर्षी या गावांमधील जनता भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. अनेकांचे महागडे पशुधन चारा पाण्याअभावी मरणयातना सहन करित आहे. दररोज सकाळी खपाटीला आलेले पोट घेऊन ही जनावरे चारा पाण्याच्या शोधात भटकंती करण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत जर या जनावरांना चारा उपलब्ध झाला नाही तर पशुधन संकटात सापडून मोठे नुकसान होऊ शकते.सध्या दुष्काळाने गंभीर रूप धारण केले असून, जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने या भागात चारा छावणी सुरू कराव्यात.- नितीन ईगंले,पशुपालक शेतकरी, खमताणे.
जनावरांना दुष्काळाची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 5:27 PM
खमताणे : बागलाण तालुक्यात खमताणे, मुंजवाड, तिळवण, कंधाणे नवेगाव परिसरात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. या भागातील तब्बल दोन हजार जनावरे चारा-पाण्याअभावी भुकेचे बळी ठरण्याच्या मार्गावर आहेत, तर काही जनावरे दगावली आहेत. त्यामुळे या मुक्या जनावरांसाठी त्वरित चारा छावण्या आणि पाण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
ठळक मुद्देबागलाण : चारा-पाण्याअभावी उपासमार ; दुध व्यवसाय धोक्यात