जमिनी परत मिळविण्यासाठी शेतकºयांच्या प्रशासनाच्या दारी चकरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 07:31 PM2017-09-18T19:31:33+5:302017-09-18T19:32:34+5:30
नाशिक : रेशीम उद्योगासाठी शेतजमिनी खरेदी करून त्यांच्या उद्योगासाठी अथवा औद्योगिक वापर न करता परस्पर विकणाºयांविरोधात दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल करून संबंधित जमिनी शेतकºयांना परत मिळाव्या, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आपणास कोणही दाद देत नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
दिंडोरी तालुक्यातील मौजे उमराळे खुर्द, नळवाडी, ओझे, निगळडोळ, जालखेड गोळशी, कोकणगाव, वणी, टिटवे, वांजुळे या गावच्या शेतकºयांनी १९९४-९५च्या सुमारास सुमारे चारशे हेक्टर शेतजमीन शेतजमीन उद्योगासाठी दिली होती. उद्योजकांनी शेतजमीन मालकांच्या मुलांना नोकºया देण्याचे आमिष दाखवून जमिनी खरेदी केल्या. परंतु येथे कोणताही उद्योग सुरू झाला नाही, तर या जमिनी अधिक नफा कमावून विकू न शेतकºयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. त्यामळे या जमिनी परत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २७ जुलैलाच दावा दाखल केला असल्याचे शेतकºयांनी सांगितले. परंतु, एक महिना उलटूनही शेतकºयांच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित गावांमधील शेतकरी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात फेºया मारत असून, आपल्या मागण्यांची कैफियत कोणीही ऐकून घेत नसल्याचा आरोप देवीदास नवले, सुनील ढाकणे, मधुकर गोडसे, शिवाजी हिरे, भास्कर गोडसे, किरण ढाकणे, ज्ञानेश्वर शिंदे, वाल्मीक घडवजे, तुळशीराम गोजरे आदि शेतकºयांनी केला आहे.