नाशिक : दिवाळीच्या फराळाकरिता लागणाऱ्या डाळी, साखर, गूळ, डाळ्या यांसारख्या किराणा मालाच्या किमती गतवर्षाच्या तुलनेत भरमसाठ वाढल्याने यंदा फराळ महागला आहे. महागाई नियंत्रणात आल्याचे सांगितले जात असले तरी वर्षभरात अनेक वस्तूंची दुपटीपेक्षा जास्त भाववाढ झालेली आहे. गतवर्षी दोन हजार रुपयांत झालेल्या फराळाच्या यादीकरिता यंदा किमान अडीच हजार रुपये मोजावे लागतील, अशी स्थिती आहे. किराणा दुकानात सामानाच्या यादीचे बिल पाहता यंदाची दिवाळी नक्कीच सर्वसामान्यांचं दिवाळं काढेल, असे चित्र आहे. दीपोत्सवाचा सण म्हणून दिवाळी घराघरांत साजरी होते. हा सण हिवाळ्यात येणारा असल्याने या दिवसात शरीराला स्निग्धतेची गरज अधिक असते. या दिवसात पचनशक्तीही वाढत असते. त्यामुळेच मिष्टान्न, तेल-तुपात तळलेल्या वस्तू सहज पचतात यामुळे वर्षभरासाठीचे बळ मिळते. यामुळेच दिवाळीत सुकामेवा असलेल्या डाळीच्या पिठाचे लाडू, करंजी, अनारसे, चिवडा, शंकरपाळे यांसारख्या तूप-तेलात तळलेले पौष्टिक फराळ करण्याची परंपरा आहे. आजही घराघरांतून ती कायम आहे. दिवाळी आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपली असून, फराळाचे पदार्थ तयार करण्यास घरोघरी सुरुवात होणार आहे. मात्र, यंदा फराळासाठी लागणाºया विविध वस्तूंच्या दरात गतवर्षाच्या तुलनेत सरासरी २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट बसवताना कसरत होत आहे.किराणा मालाची १५ ते २५ टक्के भाववाढदिवाळीत भाजणी चकली आणि विविध गोडाचे पदार्थ करण्यासाठी लागणाºया विविध किराणा मालाच्या किमतीत गतवर्षीपेक्षा यंदा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींसह रवा, मैदा आणि भाजके पोह्याचे दर मागील वर्षाच्या तुलनेत वाढल्याचे किरकोळ किराणा व्यापारी संघटनेचे शेखर दशपुते यांनी सांगितले. तर दिवाळी सणासोबतच हिवाळाही सुरू होत असल्याने या काळात स्निग्ध पदार्थांची गरज शरीराला अधिक भासते. पचनशक्तीही जास्त असते, त्यामुळे पौष्टिक, तेल-तुपाचे पदार्थांसोबत सुकामेव्याचे पदार्थही दिवाळसणाच्या निमित्ताने तयार केले जात आहेत.
किराणा दरवाढीमुळे दिवाळीचा फराळ महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:09 AM