नाशिक- श्रावण सुरु झाला असून भाविकांचा धार्मिक विधी, देवदर्शन, पुजा, पाठ आदिंवर भर असतो. सातत्याने पाऊस पडत असला तरी भाविक शहर परिसरातील तसेच जिल्ह्यातही ठिकठिकाणी देवदर्शनावर भर दिला जात आहे. शहर परिसरातील शिवमंदिरांसाठी तसेच त्र्यंबकेश्वर आदि शिवालयांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या असल्या आणि प्रशासनाने तयारी केली असली तरी दुसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची संख्या थोडी रोडावलेली दिसली. अर्थात श्रावणाच्या तिसºया सोमवारी गर्दी वाढण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणात जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.श्रावण महिन्यात गोदाघाटावरील विविध देवालये, रामकुंड, त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड, त्र्यंबकेश्वर मंदिर, ब्रह्मगिरी, गंगाद्वार आदि ठिकाणी दर्शनाला जाताना निसरड्या पायवाटेचा, पायºयांचा विचार करावा, काळजीपुर्वक चालावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पावसामुळे सराफबाजारातील फुलबाजार फुलला असून विविध प्रकारची फुले मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली आहेत.दरम्यान शहरात उघडीप न घेता गत आठवड्यापासून पावसाची रिमझिम सुरु असून रस्ते चिखलमय झाले आहेत. जुलै व आॅगस्टच्या सुरवातीस पावसाने ओढ दिली होती मात्र आता पंधरा दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी दमदार पावसाला सुरवात झाली आहे.धरणसाठ्यात वाढ झाली असून शहराबरोबरच ग्रामीण भागातुन येणाºया पावसाच्या पाण्यामुळेही पाणी पातळीत वाढ होण्यास मोठा हातभार लागत आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.पावसामुळे निर्माण झालेल्या गारठ्यात उब मिळवण्यासाठी नागरिक मक्याचे कणिस, चहा, सुप, भजी आदि गरम पदार्र्थ सेवनावर भर देत आहेत.
श्रावणामुळे देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:37 PM
शहरात उघडीप न घेता गत आठवड्यापासून पावसाची रिमझिम सुरु असून रस्ते चिखलमय झाले
ठळक मुद्देश्रावण सुरु झाला असून भाविकांचा धार्मिक विधी, देवदर्शन, पुजा, पाठ आदिंवर भर