ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वन्यजीवदिनी मिळाले बिबट्याला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:27 AM2021-03-04T04:27:28+5:302021-03-04T04:27:28+5:30

नाशिक शहराभोवती व जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढल्याची ओरड ऐकू येते. कधी बिबट्यांकडून पशुधनावर तर कधी मानवी हल्ल्याच्याही ...

Due to the vigilance of the villagers, the leopard got a lifeline on Wildlife Day | ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वन्यजीवदिनी मिळाले बिबट्याला जीवनदान

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वन्यजीवदिनी मिळाले बिबट्याला जीवनदान

Next

नाशिक शहराभोवती व जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढल्याची ओरड ऐकू येते. कधी बिबट्यांकडून पशुधनावर तर कधी मानवी हल्ल्याच्याही घटना घडतात. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात ज्या वेगाने बिबटे वाढले त्याच गतीने त्यांच्या मृत्युंचे प्रमाणही वाढल्याचे वनविभागाच्या दप्तरी असलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

औरंगाबाद महामार्गावरील नैताळे गावाजवळ अंदाजे दीड वर्षे वयाचा बिबट्या रात्रीच्या सुमारास रस्ता ओलांडत होता. यावेळी भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या वाहनचालकाने वन्यप्राणी वावर असलेल्या क्षेत्रातील सुचना फलकांकडे तसेच रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बिबट्याला वाहनाची धडक दिली. या धडकेत सुदैवाने बिबट्या जखमी झाला अन‌् रस्त्याच्या मध्यावरच निपचित पडला. ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.-

---इन्फो----

...असे झाले रेस्क्यु ऑपरेशन

पोलीस पाटील नवनाथ बोरगुडे यांनी त्वरित घटनेची माहिती पूर्व वन विभागाला कळविली. माहिती मिळताच रेस्क्यू टीमने घटनास्थळाच्या दिशेनेे सर्व अत्यावश्यक साधनसामग्रीसह धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी बिबट मादीला पिंजऱ्यात सुरक्षितरीत्या जेरबंद करत निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आले. तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी चांदोरे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी जखमी बिबट्यावर औषधोपचार करत वाहनाच्या धडकेेत गंभीर मार लागल्याचे निदान केले. या बिबट्याला वाचविण्यासाठी सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे, वनक्षेत्रपाल बशीर शेख यांचे पथक प्रयत्नशील आहे. गरज पडल्यास बिबट्याला पुणे येथील उपचार केंद्रातदेखील हलविण्याची पूर्व वन विभागाची तयारी आहे.

-

---कोट---

.वन विभागाला गावकऱ्यांनी वेळीच माहिती कळवून ‘रेस्क्यू’ पथक घटनास्थळी दाखल होईपर्यंत वाहतुकीचे चोख नियोजन केले. जखमी बिबट्या बिथरणार नाही, याबाबत दक्षता घेतली. गावकऱ्यांनी दाखविलेले प्रसंगावधान आणि सतर्कतेमुळे या वन्य प्राण्याचे प्राण वाचले. नागरिकांनी अशाचप्रकारे जागरुकता दाखविल्यास वन्यजीव-मानव संघर्षही कमी होईल आणि सहजीवनाचा प्रयोग यशस्वी होताना दिसून येईल. जखमी बिबट्याला वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून, आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.

- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक, पूर्व वन विभाग

--

फोटो आर वर ०३बिबट्या नावाने.

===Photopath===

030321\03nsk_49_03032021_13.jpg

===Caption===

बिबट्या

Web Title: Due to the vigilance of the villagers, the leopard got a lifeline on Wildlife Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.