दुर्गा, पूनम यांची सोनेरी कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 10:27 PM2018-05-06T22:27:51+5:302018-05-06T22:29:17+5:30
श्रीलंका कोलंबो येथे सुरू असलेल्या ज्युनिअर साऊथ एशियन अॅथेलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या धावपटू दुर्गा देवरे आणि पूनम सोनुने यांनी अपापल्या गटात सुवर्णपदके पटकाविली. विशेष म्हणजे या दोघींनीही १५०० मीटरमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित करून अॅथेलेटिक्समध्ये नाशिकचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
नाशिक : श्रीलंका कोलंबो येथे सुरू असलेल्या ज्युनिअर साऊथ एशियन अॅथेलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या धावपटू दुर्गा देवरे आणि पूनम सोनुने यांनी अपापल्या गटात सुवर्णपदके पटकाविली. विशेष म्हणजे या दोघींनीही १५०० मीटरमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित करून अॅथेलेटिक्समध्ये नाशिकचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. या गटात दुर्गा हिने सुवर्ण, तर पूनम सोनुनेने सिल्व्हर पदक पटकाविलले.
१५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पूनम सोनुने आणि दुर्गा देवरे यांनी समस्त क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतले. अंतिम स्पर्धेत दुर्गा देवरे हिने ४:३१:३८ तर पूनम सोनुने हिने ४:३६:६५ सेकंदाची वेळ नोंदवित नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. १५०० मीटरमध्ये यजमान श्रीलंका आणि मालदीवच्या धावपटूंचे आव्हान असतानाही या दोघींनीही निर्णायक आघाडी कायम राखत भारताला दोन पदके मिळवून दिली, तर ३००० मीटरमध्ये पूनम हिने सुवर्ण, तर ८०० मीटरमध्ये दुर्गा देवरे हिने रौप्यपदक मिळविले. या दोघींनी अंतिम फेरीपर्यंत निर्माण केलेला दबदबा कायम राहिल्याने त्यांनी आपापल्या गटातून पदके पटकाविली.