डस्टबिन फक्त परीक्षेपुरता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:46 AM2017-12-15T00:46:04+5:302017-12-15T00:46:31+5:30
महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी प्रत्येकी दोन नगांसाठी ११ हजार १२१ रुपये खर्चून डस्टबिन खरेदी केल्या असताना, शिवसेनेने बाजारातून त्यापेक्षाही उच्च दर्जाच्या डस्टबिन अवघ्या २३०४ रुपयांत खरेदी करत त्या अतिरिक्त आयुक्तांसह आरोग्याधिकाºयांना भेट देऊन डस्टबिन घोटाळ्याच्या सखोल चौकशीची मागणी केली. मात्र, सदर डस्टबिन या जानेवारी महिन्यात स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत होणाºया एका दिवसाच्या परीक्षेपुरताच बसविण्यात आल्या असून, परीक्षा आटोपल्यावर दुसºया दिवशी त्या शाळा-वसतिगृहांमध्ये बसविण्यात येणार असल्याचे अजब आणि हास्यास्पद स्पष्टीकरण आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिले. त्यामुळे, महापालिका स्वच्छ भारत अभियानाचे पुरस्कर्ते पंतप्रधान मोदींसह शासनाचीही फसवणूक करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
नाशिक : महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी प्रत्येकी दोन नगांसाठी ११ हजार १२१ रुपये खर्चून डस्टबिन खरेदी केल्या असताना, शिवसेनेने बाजारातून त्यापेक्षाही उच्च दर्जाच्या डस्टबिन अवघ्या २३०४ रुपयांत खरेदी करत त्या अतिरिक्त आयुक्तांसह आरोग्याधिकाºयांना भेट देऊन डस्टबिन घोटाळ्याच्या सखोल चौकशीची मागणी केली. मात्र, सदर डस्टबिन या जानेवारी महिन्यात स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत होणाºया एका दिवसाच्या परीक्षेपुरताच बसविण्यात आल्या असून, परीक्षा आटोपल्यावर दुसºया दिवशी त्या शाळा-वसतिगृहांमध्ये बसविण्यात येणार असल्याचे अजब आणि हास्यास्पद स्पष्टीकरण आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिले. त्यामुळे, महापालिका स्वच्छ भारत अभियानाचे पुरस्कर्ते पंतप्रधान मोदींसह शासनाचीही फसवणूक करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने ओला आणि सुका कचरा विलगीकरणासाठी काय उपाययोजना केल्या यासाठी २२ गुण आहेत. सदर गुणप्राप्तीसाठी महापालिकेने शहरातील व्यापारीपेठांमध्ये १८९ ठिकाणी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या डस्टबिन बसविल्या आहेत. सदर प्रत्येकी दोन नग ५५ लिटर्स क्षमतेच्या डस्टबिनची खरेदी सर्वांत कमी दर देणाºया नाशिकच्याच रोटोमॅटिक कंटेनर्स या कंपनीकडून करण्यात आली असून, त्यासाठी चक्क ११ हजार १२१ रुपये दर मोजण्यात आला आहे. या डस्टबिन खरेदीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शिवसेनेने गुरुवारी (दि.१४) बाजारातून उच्च दर्जाच्या ८० लिटर्स क्षमतेच्या हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन डस्टबिन जीएसटीसह अवघ्या २३०४ रुपयांमध्ये खरेदी करून आणत त्या अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे आणि आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांना भेट दिल्या आणि या प्रकाराची सखोल चौकशी झाली नाही तर येणारी महासभाच होऊ न देण्याचा इशारा दिला. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन डस्टबिन खरेदीप्रकरणी जाब विचारला. यावेळी, खुलासा करताना आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी सांगितले, स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत जानेवारीत परीक्षा होणार असून, २२ गुण मिळविण्यासाठी या डस्टबिन बसविलेल्या आहेत. एक दिवसाची परीक्षा झाल्यानंतर त्या दुसºया दिवशी काढून घेत शाळा, महिला वसतिगृह यांना दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १८९ डस्टबिन खरेदी करण्यात आल्या असून एकूण ६०० डस्टबिन खरेदी करण्यात येणार असल्याचेही अजब उत्तर आरोग्याधिकाºयांनी दिले. आरोग्याधिकाºयांच्या या अजब उत्तराने शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि डस्टबिन घोटाळ्याबरोबरच केवळ परीक्षेपुरता डस्टबिन लावून आपण पंतप्रधान मोदी आणि शासनाची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. आपण उत्तर देऊन फसल्याचे लक्षात आल्यानंतर आरोग्याधिकाºयांनी नंतर सारवासारव करण्यास सुरुवात केली आणि आपले हे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले. या साºया प्रकारामुळे डस्टबिन प्रकरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आंदोलनप्रसंगी नगरसेवक रमेश धोंगडे, डी. जी. सूर्यवंशी, प्रशांत दिवे, श्यामकुमार साबळे, प्रवीण तिदमे, दीपक दातीर, संतोष गायकवाड, भागवत आरोटे, पूनम मोगरे, नयना गांगुर्डे, सीमा निगळ, श्यामला दीक्षित, सुनील गोडसे, रत्नमाला राणे आदी उपस्थित होते.
आयुक्तांच्या मान्यतेने खरेदी
विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सदर डस्टबिन खरेदीला महासभेची प्रशासकीय मान्यता घेतली होती काय, असा सवाल केला असता आरोग्याधिकाºयांनी सदर खरेदी ही स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेने झाल्याचे सांगितले. यावेळी अजय बोरस्ते यांनी सदर खरेदी ही महासभेला अंधारात ठेवून झाली असून, शहर पुन्हा कचराकुंडीयुक्त करण्यात येत आहे. याशिवाय, अव्वाच्या सव्वा किंमत मोजून सदर डस्टबिन खरेदी करण्यात आल्याचा आरोप करत येत्या महासभेत त्याबाबत आवाज उठविण्यात येणार असल्याचेही बोरस्ते यांनी सांगितले.
सुरक्षाधिकाºयांना हुसकावले
अतिरिक्त आयुक्तांकडे डस्टबिन भेट देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक येणार असल्याचे कळताच अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या दालनापुढे सुरक्षारक्षकांचा गराडा पडला. शिष्टमंडळ अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी दालनातही प्रवेश केला. त्यावेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, विलास शिंदे यांच्यासह नगरसेवकांनी हे सुरक्षारक्षक कशासाठी, असा सवाल करत त्या सुरक्षारक्षकांना हुसकावून लावले. शिवसेना पदाधिकाºयांचा नूर पाहून अतिरिक्त आयुक्तांनीही सदर सुरक्षारक्षकांना बाहेर जाण्यास सांगितले.