कळवण रोटरीतर्फे शाळांना ई-लर्निंग साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:16 PM2018-11-18T22:16:33+5:302018-11-19T00:45:54+5:30
रोटरी क्लब आॅफ कळवणच्या वतीने व नाशिक, कळवण येथील रोटेरियन्सच्या सहकाऱ्याने कळवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिरसमणी, नाकोडे, एकलहरे, दरेगाव येथील शाळांना तसेच आठंबे येथील आश्रमशाळेला संगणक व स्मार्ट टीव्ही आदी साहित्य भेट देण्यात आले.
कळवण : रोटरी क्लब आॅफ कळवणच्या वतीने व नाशिक, कळवण येथील रोटेरियन्सच्या सहकाऱ्याने कळवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिरसमणी, नाकोडे, एकलहरे, दरेगाव येथील शाळांना तसेच आठंबे येथील आश्रमशाळेला संगणक व स्मार्ट टीव्ही आदी साहित्य भेट देण्यात आले.
कळवण तालुक्यातील आदिवासीबहुल शाळांना डिजिटल बनविण्यासाठी रोटरीने पुढाकार घेतला असून, रोटरीचे प्रांतपाल राजीव शर्मा, चेतन भगत, रोटरीचे अध्यक्ष निंबा पगार, सेक्रेटरी रवींद्र पगार व सदस्यांच्या हस्ते संगणक व स्मार्ट टीव्ही आदी साहित्य शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले. समाजातील वंचित घटकांसाठी रोटरीची नेहमीच मदत असते. आदिवासी भागात सुविधा नाही म्हणून विद्यार्थी शिक्षणात कमी पडू नये यासाठी रोटरी प्रयत्नशील आहे, असे प्रांतपाल राजीव शर्मा यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रकल्प समन्वयक मोहनलाल संचेती, विलास शिरोरे, जितेंद्र कापडणे, डॉ. आर. डी. भामरे, डॉ. एस. बी. सोनवणे, बापू कुमावत, राजेश मुसळे, गंगा पगार, जयश्री शिरोरे, रोहिणी कापडणे आदी रोटरीचे सदस्य उपस्थित होते.
कळवण रोटरीतर्फे
शाळांना ई-लर्निंग साहित्य भेट
कळवण रोटरी क्लबच्या वतीने शाळांना ई-लर्निंगचे साहित्य वाटप करताना राजीव शर्मा, चेतन भगत, निंबा पगार, प्रा. रवींद्र पगार, विलास शिरोरे, जितेंद्र कापडणे, बापू कुमावत, मोहनलाल संचेती, गंगाधर गुंजाळ आदी.