सप्तश्रृंग गडावरील अर्थचक्र मंदावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 09:30 PM2020-09-12T21:30:37+5:302020-09-13T00:17:03+5:30
कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तश्रृंग निवासनीच्या गडावरील अर्थचक्र कोरोनामुळे मंदावले असून, व्यावसायिकांचे जगणे ’लॉक’ झाल्याची भावना व्यक्त होत अहे. कोरोनाचे संम्कट केव्हा दूर होईल आणि देवी भक्तांना दर्शनासाठी मंदिर कधी कुले होईल याची आस लागली आहे.
कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तश्रृंग निवासनीच्या गडावरील अर्थचक्र कोरोनामुळे मंदावले असून, व्यावसायिकांचे जगणे ’लॉक’ झाल्याची भावना व्यक्त होत अहे. कोरोनाचे संम्कट केव्हा दूर होईल आणि देवी भक्तांना दर्शनासाठी मंदिर कधी कुले होईल याची आस लागली आहे.
सप्तश्रंग गडावर कोणतेही इतर उपजीविकेचे साधन नसल्याने अर्थचक्र पूर्णत: थांबले आहे. वर्षभरात दोन यात्रोत्सव व दैनंदिन येणार्या भाविकांमुळे अनेकांच्या हाताला येथे काम मिळते. फुल, प्रसाद, खण-नारळ विक्र ेता, पार्किंग, हॉटेल व्यवसाय करणार्या अनेकांसाठी सप्तशृंग गड म्हणजे पोटापाण्याची सोय आहे. मात्र, कोरोनाचा कहर सुरू झाला व गडावरील व्यावसायिकांचे जगणेच लॉक झाले आहे. भाविक, पर्यटकांसाठी देवीदर्शन खुले करावे, नियमांचे पालन करीत गडावर दर्शन सुविधा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कळवण हा आदिवासी व ग्रामीण तालुका आहे. तालुक्यातील साडेनऊ हेक्टरवर पसरलेल्या सप्तशृंगी गडावर राहणार्या प्रत्येक घटकाची दिनचर्या मंदिर व भविकांवरच अवलंबून आहे. इथे ना शेती ना अन्य दुसरा व्यवसाय करण्यास वाव. मात्र कोरोनामुळे सध्या गडावर शुकशुकाट पसरला आहे. बंद दुकाने, सुनासुना परिसर पाहून येथली रहिवाशी रडकुंडीला आले आहेत. दररोज पहाटे धुक्याच्या मखमली दुलईतून गड जागा होतो. चोहीकडे निसर्ग खुललेला असतो. धबधबे खळाळत असतात. पानफुलं, पक्षी साद घालत असतात. मात्र काही क्षणात वास्तवाचे सूर्यकिरण गडावर येतात आणि येथील रहिवाशांसाठी पुढचा संपूर्ण दिवस भाकरीचा चंद्र शोधण्यातच जातो. बहरलेला निसर्ग आता येथील रहिवाशांना खायला उठत आहे. कधी एकदाचे आई भगवतीचे दर्शन सुरू होते, मंदिर सर्वांसाठी खुले होते आणि भाविकांची वर्दळ सुरू होते, याकडे येथील व्यावसायिकांचे डोळे लागले आहेत.
ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प
सप्तशृंग गड ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची एक महत्त्वाची बाजू ठरणारा विषय म्हणजे प्रवेशशुल्क. गावात प्रवेश करणार्या भाविक, पर्यटक यांच्या वाहनांकडून प्रवेशशुल्क रु पात ग्रामपंचायतीला उत्पन्न सुरू झाले होते. मात्र, आता हे उत्पन्नही बंद झाले. गड ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीची मुदत संपली आहे. मात्र कोरोनामुळे निवडणूक लांबली आहे. ग्रामपंचायतीकडे निधीही नसल्याने विकासकामेही मंदावली गेली आहेत.
लॉकडाउन काळात देवस्थान ट्रस्टकडून स्थानिक गरजूंना अन्नदान सुरू होते. त्याच कालावधीत गडावर कोरोना रु ग्ण सापडल्याने हे भोजनालय बंद करण्यात आले. त्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे. मात्र, आता गडावर एकही रु ग्ण नाही. ट्रस्टने भोजनालय पुन्हा सुरू करावे.
- बबलू गायकवाड, व्यावसायिक, सप्तशृंग गड
सप्तश्रृंग गडावर 700 हून अधिक छोटे-मोठे दुकानदार आहेत. गेल्या पाच महिन्यांत प्रत्येक दुकानदाराचे 2 ते 3 लाखांचे उत्पन्न बुडाले. आता फार अंत न पाहता शासनाने मंदिर भाविकांसाठी खुले करुन दिलासा द्यावा. अन्यथा स्थानिकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
- रामप्रसाद बत्तासे, व्यावसायिक, सप्तश्रृंग गड
करोनाकाळात ट्रस्टने 1 मार्चपासून करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य जनजागृती अभियान सुरू केले आहे. लॉकडाउन कालावधीत 1500 ग्रामस्थांना दोन वेळचे मोफत भोजन दिले. कोणत्याही कर्मचार्याला कमी न करता त्यांच्याकडून इमारती व प्रकल्पनाची उभारणी, नूतनीकरण, देखभाल-दुरु स्ती, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, शिवालाय स्वच्छता, इतर प्रलंबित कामे करून घेतली. भक्तांनाही संस्थेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन दर्शन तसेच सोशल मीडियावर दररोज दर्शन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, देवस्थान ट्रस्ट
(फोटो :12गड)