नाशिक : मतदार पुनरीक्षण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या बैठकांना अनुपस्थित राहण्याबरोबरच बीएलओंना नियुक्तीचे आदेश न बजावणे, निवडणुकीच्या कामाकडे दुर्लक्ष करणे अशा विविध कारणास्तव महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिलेला खुलासा अमान्य करून निवडणूक अधिकाºयांनी आता नाशिक शहरातील मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कामाचे समन्वयक म्हणून उपासनी यांच्यावरच जबाबदारी निश्चित केली असून, बीएलओेंकडून काम करून घेण्याकडे दुर्लक्ष न करण्याची ताकीद दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू करण्यात आली असून, नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांतील मतदार केंद्रनिहाय बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. शहरी भागात नेमलेल्या बीएलओंमध्ये नाशिक महापालिकेच्या शाळेतील व काही खासगी अनुदानित शाळेच्या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, महापालिकेच्या शिक्षकांच्या नेमणुकीचे आदेश निवडणूक अधिकाºयांनी शिक्षण मंडळाकडे बजावण्यासाठी सोपविले होते. परंतु, शिक्षण मंडळाने शिक्षकांना नियुक्तीचे आदेश बजावले नाहीत. त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी निवडणूक अधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन बैठकांना शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दांडी मारली. शिक्षकांना नेमणूक आदेश न मिळाल्यामुळे नाशिक शहरात मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबू शकला नाही. या साºया बाबी लक्षात घेऊन तीन दिवसांपूर्वी निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी नितीन उपासनी यांना नोटीस बजावून चोवीस तासांच्या आत समक्ष उपस्थित राहून खुलासा करण्याचे आदेश दिले होते.नोटिसीप्रमाणे उपासनी यांनी गुरुवारी आपला लेखी खुलासा निवडणूक अधिकाºयांकडे समक्ष सादर केला व त्यात आपल्यावरील सारे आरोप त्यांनी फेटाळून निवडणूक कामात हलगर्जीपणा न केल्याचा खुलासा केला होता. डॉ. मंगरुळे यांनी हा खुलासा नाकारला असून, उलट त्यांना दुसरी नोटीस बजावून मोहीम पूर्ण होईपर्यंत शहरातील बीएलओंसाठी समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. बीएलओंकडून काम पूर्ण करून घेण्याचे काम उपासनी यांनी करावे तसेच या कामाकडे दुर्लक्ष करू नये, अशी सक्त ताकीदच त्यांना दिली आहे. मतदार पुनरीक्षण मोहीम पूर्ण करण्याची मुदत १५ डिसेंबर असून, त्यामानाने शहरात बीएलओंनी अद्याप कामालाही सुरुवात केलेली नसल्याने उपासनी यांची कसोटी लागणार आहे.
मनपा प्रशासनाधिकाºयांना निवडणूक शाखेची ताकीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:37 AM