वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे गावात गेल्या तीन दिवसापासून वीज गायब असून नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचेदेखील हाल होऊ लागले आहेत. ऐन उन्हाळ्यात वीज गायब असल्याने वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. रोहित्र जळाल्याने ही समस्या उत्पन्न झाली आहे. मात्र वीज वितरण कर्मचारी याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.वाडीवऱ्हे गाव बाजारपेठेचे मोठे गाव असून, याठिकाणी सलग तीन दिवस वीज नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे वीज बिलांची जोरात वसुली मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र नागरिकांना विजेअभावी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.तीन दिवसात तीन ट्रान्सफार्मर जळाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याचे पाणीदेखील मिळत नसल्याने गैरसोय होत असून, आधीच अतिशय उष्णता त्यात पाण्यासाठी वणवण होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. कडक निर्बंधांमुळे नागरिक घरात असल्याने लहान बालके, वृद्धदेखील वाढत्या उकाड्याने घराबाहेर पडत आहेत. विजेअभावी गावातील पीठ गिरण्या बंद आहेत, मोबाईल चार्जिंग होत नाही. वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिक संतप्त झाले असून वीज वितरण कार्यालयाने त्वरित विजेची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. (२८ एमएसइबी १)
वाडीवऱ्हेत विजेचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 8:59 PM
वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे गावात गेल्या तीन दिवसापासून वीज गायब असून नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचेदेखील हाल होऊ लागले आहेत. ऐन उन्हाळ्यात वीज गायब असल्याने वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. रोहित्र जळाल्याने ही समस्या उत्पन्न झाली आहे. मात्र वीज वितरण कर्मचारी याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देदुर्लक्ष : अर्धे गाव तीन दिवसापासून अंधारात