नाशिक : महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनी आता एक कुटुंब झाले आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा, नाटक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आदी विविध उपक्रम सुरू केले आहेत. वीजग्राहक आपले देव आहेत. कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांना देव मानून त्यांचा सन्मान करावा. जे आपल्याशी देवासारखे वागतात त्यांच्याशी देवासारखेच वागा, असे प्रतिपादन राज्य वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले.कर्मचाºयांचा ताण कमी व्हावा आणि एकमेकांप्रती स्नेहभाव दृढ व्हावा, यासाठी राज्य वीज वितरण कंपनीच्या नाशिक परिमंडळतर्फे मनोरंजनात्मक नवऊर्जा धमाल २०२० या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाशिकचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोगी, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, मालेगावचे अधीक्षक अभियंता रमेश सानप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जनवीर म्हणाले, प्रत्येक यशस्वी माणसामागे एक स्त्री असते. अशा कौटुंबिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या महिलांनाही ऊर्जा मिळाली तर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल. यावेळी कंपनीतील गुणवंत कर्मचारी, पाल्य संतोष घोलप, निवेदिता धारराव, योगेश बर्वे, गणेश कापडणीस, सेजल सुरडकर यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर फुल २ धमाल या आॅर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले. यात कंपनीतील कर्मचाºयांनीही आपल्या कलेचे सादरीकरण केले. उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगत गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद राजेभोसले यांनी केले. कार्यक्रमास कंपनीतील कर्मचारी सहकुटुंब उपस्थित होते.
वीजग्राहकांना सन्मान द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:48 PM
महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनी आता एक कुटुंब झाले आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा, नाटक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आदी विविध उपक्रम सुरू केले आहेत. वीजग्राहक आपले देव आहेत. कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांना देव मानून त्यांचा सन्मान करावा. जे आपल्याशी देवासारखे वागतात त्यांच्याशी देवासारखेच वागा, असे प्रतिपादन राज्य वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले.
ठळक मुद्देजनवीर : महावितरण कंपनीचा ‘नवऊर्जा धमाल-२०२०’ कार्यक्रम