नाशिक: पोलिसांसाठी सुरू करण्यात आलेल्या पोलीस कोविड सेंटरमधून मंगळावारी (दि.२८) ११ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. या कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आयुक्तांनी पोलीस कोविड सेंटमधील उपचाराच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले.पोलीस आायुक्त दिपक पांण्डेय यांच्या संकल्पनेतू उभे राहिलेल्या पोलीस कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित पोलिसांवर उपचार केले जात आहे. गेल्या २० रोजी उपचारासाठी दाखल झालेल्या ४५ रूग्णांपैकी ११ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. या रूग्णांच्या सत्कारासाठी पोलीस आयुक्तालायात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्तांनी कोविड सेंटरमधील उपचार आणि सुविधांबाबत समाधान व्यक्त करतांना कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत देवरे आणि डॉ. सचिन देवरे तसेच त्यांचे कर्मचारी उपक्रम राबवित असल्याने त्यांनी आरोग्य कर्मचाºयांचेही कौतुक केले.यावेळी बरे झालेल्या रुग्ण कर्मचाºयांनी आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस उपायुक्त पोर्णिमा श्रींगी यांनी देखील रूग्णांशी संवाद साधला. याप्रसंगी डॉ. प्रशांत देवरे यांनी सांगितले की, या कोविड सेंटरमध्ये दाखल होणारे रूग्ण अथवा त्यांचे नातेवाईक हे पोलीस दलाशी संबंधित असल्यामुळे उपचारादरम्यान रूग्णांना आपल्या कुटूंबातच असल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे ते मानसिकदृट्या सक्षम होऊन लवकर बरे होण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.पोलीस उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, विजय खरात तसेच वैद्यकीय पथकातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी अ ाणि कर्मचारी, रूग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.