नाशिक- वंदे मातरम्, विजयी विश्व तिरंगाा प्यारा अशी अनेक राष्ट्रभक्तीपर गिते अकरा हजार मुलांनी एकाच सुरात सदर केली आणि राष्ट्रभक्ति भक्ती जागविली. झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
गेल्या सहा वर्षांपासून संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्यनिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात येतो आणि शहरातील विविध शाळांमधील मुले त्यात सहभागी होत असतात. आज सकाळी पंचवटीतील श्रीराम विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विविध शाळांमधील अकरा हजार मुले सहभागी झाली होती. यावेळी विजयी विश्व तिरंगा प्यारा या गीताबरोबरच साने गुरूजींच्या खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ही रचना, मंगेश पाडगावकर यांची तु नव्या जगाची आशा, जय जय भारत देश त्यानंतर संत तुकडोजी महाराज यांची या भारतात बंधूभाव नित्य वसु दे आणि शेवटी कवी वसंत बापट यांची हम युवकों का नारा है, भारत हमको प्यारा है ही गीते तालासुरात सादर केली.
झेप सांस्कृतिक कला व क्र ीडा मंडळाचे संस्थापक माजी उपमहापौर तथा नगरसेवक गुरु मति बग्गा यांनी कार्यक्र माचे आयोजन केले होते. कार्यक्र मास जिल्हाधिकारी सुरज मांढरे, आमदार अॅड. राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, गोरख बलकवडे, डॉ. कैलास कमोद, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी महापौर अशोक मुर्तडक, नगरसेवक विमल पाटील, नंदिनी बोडके उपस्थित होते.