अध्यक्षस्थानी उपप्राचार्य रवींद्र शिरूडे होते. या वेळी उपप्राचार्य राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक प्रवीण पाटील, संजीव महाले, बाळासाहेब सोनवणे, प्राध्यापिका शीतल शिंदे, पुष्पा वाघ, रोहिणी ठोके, आशा पगार, मनीषा आहेर, कार्यालयीन प्रमुख जे.एस. कन्नोर, संजय सूर्यवंशी, पांडुरंग शेलार, प्रमोद पिंपळसे, सचिन लिंगायत व्यासपीठावर उपस्थित होते. प्रतिमा पूजन करून शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षिका मनीषा आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य शिरूडे यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. निबंध व वक्तृत्व स्पर्धेचा निकाल शशिकांत पवार यांनी जाहीर केला. आभार राजेश धनवट यांनी मानले. वक्तृत्व स्पर्धेत श्यामराव दिसले (प्रथम क्रमांक), राजवर्धन पाटील (द्वितीय क्रमांक), ओमकार जाधव (तृतीय क्रमांक), ओमकार सूर्यवंशी याने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. निबंध स्पर्धेत नितेश माळी (प्रथम क्रमांक), आशिष जगताप (द्वितीय क्रमांक), राज खैरनार (तृतीय क्रमांक) पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धा विभागप्रमुख आर.बी. बच्छाव, के.डी. देवरे तसेच निबंध स्पर्धाप्रमुख व्ही.पी. मगर, के.डी. शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले. जी.यू. कोकरे, सचिन लिंगायत, जयदीप शेवाळे, डी.डी. अहिरे, हरित सेनेचे आर.एम. खैरनार उपस्थित होते.