नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचे ओझर विमानतळावर इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले. शहा अकोले येथील सभेला जाण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते; मात्र पावसाळी वातावरणामुळे सभा रद्द करण्याची वेळ ओढावली आहे. कर्जत-जामखेड व अकोले येथे होणाऱ्या सभेला फटका बसला आहे. शहा यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळेओझरच्या विमानतळावर उतरविले गेले. नाशिकमध्ये सकाळपासूनच ढगाळ हवामान असून दुपारी साडेबारा वाजेपासून शहरात रिमझीम पाऊस सुरू झााला आहे. पावासाळी वातावरणासह आकाशात विजांचा लखलखाटासह मेघगर्जनेत पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्यात वर्तविण्यात आला आहे. अचानकपणे वैमानिक व सुरक्षा यंत्रणेच्या सल्ल्यानुसार शहा यांचे हेलिकॉप्टरचे लॅन्डिंग काही वेळ ओझरच्या विमानतळावर केले गेले. एअर ट्रॅफिक कंट्रोलद्वारे शहा यांच्या पुढील प्रवासाला हिरवा झेंडा दाखविला गेल्याने त्यांच्या हेलिकॉप्टरने पुन्हा सभेसाठी उड्डाण केल्याचे समजते.
अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचे ओझरला इमर्जन्सी लॅन्डींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 4:06 PM
पावासाळी वातावरणासह आकाशात विजांचा लखलखाटासह मेघगर्जनेत पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्यात वर्तविण्यात आला आहे.
ठळक मुद्देकर्जत-जामखेड व अकोले येथे होणाऱ्या सभेला फटका बसला शहा यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे ओझरच्या विमानतळावर उतरविले