तस्करी रोखण्यासाठी वन नाक्यांचे सक्षमीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:55+5:302021-03-07T04:14:55+5:30
नाशिक जिल्ह्यातील पूर्व, पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा, उंबरठाण या वनपरिक्षेत्रांची हद्द गुजरातला लागून आहे. या वनपरिक्षेत्रांमधील ...
नाशिक जिल्ह्यातील पूर्व, पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा, उंबरठाण या वनपरिक्षेत्रांची हद्द गुजरातला लागून आहे. या वनपरिक्षेत्रांमधील जंगलांमध्ये साग, खैरांची वृक्ष मोठ्या संख्येने आहे. यामुळे येथील जंगलात स्थानिक गावकऱ्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेत त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या मदतीने तस्करटोळ्यांची येथील जंगलात वारंवार धाड टाकली जात असते. तस्कर टोळ्या आणि वनविभागांचे गस्ती पथके यांच्यामध्ये सातत्याने पाठशिवणीचा खेळ सुरू असतो. बहुतांश तस्कर टोळ्या या गुजरातस्थित असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तस्करी करणारे गुजरातमधील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्यासाठी नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्या अध्यक्षतेखाली बॉर्डर मीटिंग सापुतारा येथे बोलविण्यात आली होती. यावेळी सुरत व डांग वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक मनिश्वर राजा, सोनवणे, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, अग्नेश्वर व्यास, पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक हेमंत शेवाळे आदी उपस्थित होते.