नाशिकरोड : १९९५ पासून लागु झालेल्या इपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन लागू करावी या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात येत्या १६ नोव्हेंबर रोजी मोर्चा, रस्ता रोको व धरणे आंदोलनात इपीएस पेन्शन धारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन इपीएस पेन्शनधारक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांनी केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून इपीएस संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सुधाकर गुजराती, उपाध्यक्ष नामदेव बोराडे, सचिव डी.व्ही. जोशी, व्हि.डी.धनवटे, रमेश उपाध्ये, विष्णुपंत गायखे, शिवाजी म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.प्रास्ताविक विष्णुपंत गायखे यांनी केले. मेळाव्याला रामचंद्र टिळे, भाऊसाहेब आडके, विठ्ठल घुले, मधुकर मुठाळ, शिवराम गायधनी, बन्सीलाल पोरजे, कांतीलाल गायधनी, कारभारी बोराडे, कचरू आवारे, किसन कांडेकर, मधुकर चंद्रे, मधुकर काळे आदि उपस्थित होते. चेहेडी येथे इ.पी.एस पेशन्स धारकांच्या झालेल्या मेळाव्यात बोलतांना देसले म्हणाले की, इपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन लागु करावी या मागणीकडे केंद्र शासन दुर्लक्ष करीत आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १६ नोव्हेंबरला इगतपुरी व नाशिक तालुक्यात मोर्चा, जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच इतर चार जिल्ह्यात रस्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
इपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन लागू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 1:33 AM