नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आरोग्य नियमांचे पालन करीत झालेल्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला.शिवजयंतीचा दरवर्षी उत्साह काही औरच असतो. मिरवणुकांसह अनेक कार्यक्रम होत असले तरी यंदा कोरोनामुळे त्यावर मर्यादा आल्या. तिथीनुसार शिवजयंतीला देखील मिरवणुका काढता आल्या नसल्या तरी प्रतिमा पूजनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी पार पडले.व्दारका चौफुलीवरील शहीद भगतसिंग चौकात हिंदू एकता आंदोलन पक्ष व शहीद भगतसिंग क्रांतिवीर मंडळ शिवजयंती उत्सव यांच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या पुतळ्यास महापौर सतीश कुलकर्णी व हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे वीरेंद्र सिंग टिळे ,भाजपाचे बबलू सिंग परदेशी ,काँग्रेसचे ज्ञानेश्वर काळे राष्ट्रवादीचे बालम पटेल, शिवजयंती उत्सव अध्यक्ष अनिल जाधव, प्रसाद पवार बावरी, किरणसिंग पवार ,अतुल रणसिंगे श्याम पवार अशोक गांगुर्डे ,राजेश तेलंग, घनश्याम परदेशी ,उमेश पाटील नितीन काथवटे विजय पवार कैलास शिंदे राजेंद्र नेरकर यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदू एकता तर्फे नाशिक शहरातील सीबीएस येथे निफाड येथील जिल्हा परीषद सदस्य अमृता पवार तसेच शहरातील मालेगाव स्टँड पंचवटी ,नासिक रोड या भागातील छत्रपती यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सातपूर येथे कार्यक्रमसातपूर येथे प्रभाग क्रमांक ११ मध्ये सातपूर कॉलनीतील मनसे नगरसेवक सलीम शेख यांच्या संपर्क कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी यांची जयंती साजरी करण्यात आली. नगरसेवक सलीम शेख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी विश्वनाथ धुळे, ज्ञानेश्वर बगडे,विजय उल्हारे,वैभव महिरे,विजय जगताप, दीपक पान पाटील,पंढरीनाथ पाटील,दादा कोकणे, कल्याणराव जाधव,कौतीक सिंदखेडे,काशीनाथ देसले, संजय खैरनार आदीसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.फोटो आरवर ३१ एमएनएस :- मनसे कार्यालयात प्रतिमा पूजन करताना नगरसेवक सलीम शेख समवेत विश्वनाथ धुळे, ज्ञानेश्वर बगडे,विजय उल्हारे,वैभव महिरे,विजय जगताप, पंढरीनाथ पाटील,काशीनाथ देसले,संजय खैरनार आदी.
शिवरायांना ठिकठिकाणी उत्साहात अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:37 PM
नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आरोग्य नियमांचे पालन करीत झालेल्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला.
ठळक मुद्देतिथीनुसार जयंती: उत्साहात प्रतिमा पुजन