उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ सरदार गुरदेवसिंगजी बिरदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:15 AM2021-05-20T04:15:38+5:302021-05-20T04:15:38+5:30
शिक्षणावर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यामुळे नाशकात शैक्षणिक हब (केजी ते पीजी) सुरू करण्याचे उराशी बाळगलेल्या बिरदी यांनी १९७८ ...
शिक्षणावर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यामुळे नाशकात शैक्षणिक हब (केजी ते पीजी) सुरू करण्याचे उराशी बाळगलेल्या बिरदी यांनी १९७८ मध्ये तसा अध्याय सुरू केला तो गुरू गोबिंद सिंह फाऊंडेशनच्या स्वरूपात. प्रारंभी ९ संख्येने विद्यार्थी असलेल्या या संस्थेच्या परिघात आज तब्बल सात हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. नाशिकच्या शीख बांधवांनी दान केलेल्या बारा एकर परिसरात विद्यार्थ्यांना युजी (डिग्री). डिप्लोमा आणि स्कूलिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यात राष्ट्रपती पुरस्कार (१९८४ ) आणि वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचा लाईफ टाईम अॅचिव्हमेंट अवॉर्ड फॉर एज्युकेशन (२०१८) यांचा समावेश आहे. गेल्या १३ मे रोजी प्रदीर्घ आजारादरम्यान हृदयविकाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.