नाशिक: राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी या योजनेला जिल्'ात लॉकडाऊनच्या काळातही प्रतिसाद लाभल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे. ऐन लॉकडाऊनमध्ये जिल्'ातील ४४ केंद्रांवर दररोज सुमारे साडेसहा हजार नागरीक शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत असल्याची आकडेवारी पुरवठा विभागाने दिली आहे.राज्यात शिवभोजन थाळी सुरू झाल्यानंतर सुरूवातील दहा रूपयांत जेवण दिले जात होते. कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेला जिल्'ात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.जिल्'ात गेल्या सप्टेबर महिन्यातील आकडेवारी पाहिली असता १ लाख ८५ हजार ५०६ नागरीकांनी शिवभोजन थाळी योजनेचा लाभ घेतल्याची नोंद झालेली आहे. या आकडेवारीचा विचार केला तर दैनंदिन सरासरी ६ हजार १०० लोक योजनेचा दररोज लाभ घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरासरी ६ हजार ७०० थाळी एव्हढी वाढ असल्याची नोंद झालेली आहे. शिवभोजन थाळी योजना सुरू झाल्यापासून जिल्'ात ३० सप्टेबर या कालावधीत एकुण दहा लाख ७८ हजार ४३७ लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याचे दिसून येते.राज्यात गेल्या दहा महिन्यात सुमारे दोन कोटी नागरीकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतल्याने हा एक विक्रम मानला जात आहे.कमी किंमतीचा परिणाम?लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडण्याचे असलेले निर्बंध आणि त्यानंतर त्यामध्ये काहीप्रमाणात शिथिलता दिल्यानंतरही शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात आले. केवळ पाच रूपये या प्रमाणे थाळी असल्याने लॉकडाऊन काळातही लाभार्थी वाढल्याचा दावा सुत्रांनी केला.गर्दीच्या ठिकाणी केंद्रेनागरीकांनी वर्दळ असलेल्या भागात शिवभोजन थाळीची केंद्रे असल्याने प्रतिसाद अधिक मिळत असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. रेल्वेस्थानक परिसर, बाजार समिती, बसस्थानके, जिल्हाधिकारी कार्यालय,प्रमुख चौक अशा ठिकाणी ही केंद्रे आहेत.