चिमणी वाचविण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज : कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 07:36 PM2020-02-01T19:36:48+5:302020-02-01T19:42:22+5:30
दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढत असलेली सिमेंटची जंगले आणि वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे जवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत. तसेच नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर येत असून यासाठी आज अनेक सामाजिक संस्था काम करत आहे. त्यातलीच एक ‘निसर्गसेवक’ संस्था ही गेल्या चार वर्षांपासून नासर्डी नदी म्हणजेच नुकतेच नावारुपाला येत असलेली ‘नंदीनी’ नदीच्या संर्वधनासाठी अहोरात्र काम करत आहे. याच पार्श्चभुमिवर संख्येचे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी चिमणी संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले.
नाशिक : दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढत असलेली सिमेंटची जंगले आणि वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे जवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत. तसेच नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर येत असून यासाठी आज अनेक सामाजिक संस्था काम करत आहे. त्यातलीच एक ‘निसर्गसेवक’ संस्था ही गेल्या चार वर्षांपासून नासर्डी नदी म्हणजेच नुकतेच नावारुपाला येत असलेली ‘नंदीनी’ नदीच्या संर्वधनासाठी अहोरात्र काम करत आहे. याच पार्श्चभुमिवर संख्येचे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी चिमणी संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले.
प्रश्न : नासर्डी बचाव उपक्रमाची सुरुवात कशी झाली?
कुलकर्णी : माझ्या परिसरात पिण्याच्या पाण्याची होत असलेली नासाडी बघून मी त्यासाठी जनजागृती पत्रके वाटत फिरायचो. मात्र याला प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने यासाठी उपाययोजना कराव्यात यासाठी मी प्रयत्न सुरु केले. तसेच नासर्डीच्या जवळच राहत असल्याने लहानपणापासून नदीचे होत असलेले प्रदुषण बघत होतो. त्यामुळे तीला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी महापालिकेसोबत अनेक विषयावर चर्चाही केली मात्र त्यांच्याकडून न मिळणारा सकारात्मक प्रतिसाद बघून यासाठी काही जणांना घेवुन ‘निसर्गसेवक’ संस्थेची स्थापना केली व मित्रांच्या वाढदिवसाच्या दिवशी नदीच्या किनारी वृक्षरोपण करत गेलो. त्यांनतर नासर्डीचे नाव नंदिनी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जसा गोदात्सव साजरा केला जातो तसा नंदिनीउत्सव सुरुकेला. यासाठी दिवाळीत नदीच्या किनारी दिपोत्सव व शिवार फेरी सुरु केली. तसेच नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी येथे गणपती मुर्तींचे विर्सजन न होऊन देता संकलन केले. तसेच प्रदुषणमक्त नासर्डीसाठी पाठपुरावा केल्यामुळे नुकतेच महापालिकेने नदी साफ करण्यासाठी नदीत राबोट उतरविण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढेही असेच कार्य करत राहणार आहे.
प्रश्न : चिमणी बचाव उपक्रमाचा उद्देश काय आहे?
कुलकर्णी : सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. मात्र दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढत चालेली सिमेंटचे जंगले आणि वृक्षांच्या घटत्या चिमण्यांच्या संख्येत घट होत आहे. कधी काळी अंगणात, घरात आणि अनेक वेळा जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी आता दिसेनासी झाली आहे. मात्र या चिमण्यांना परत आणण्यासाठी आणि त्यांना वाचविण्यासाठीच मी उपाययोजना सुरु केली. यासाठी आजवर अनेक वनउद्यानात चिमण्यासाठी घरटे, पिण्याच्या पाण्याचे भांडे बसविण्याचे काम सुरु आहे. संस्थेतर्फे पांडवलेनी उद्यानात ‘चिमन्यांची वस्ती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यात संस्थेतर्फे उद्यानात चिमण्यांना राहण्यासाठी लाकडी घरटे तयार करुन अनेक झाडांवर ही घरटे लावण्यात आली. तसेच उन्हाळ्यात अनेक ठिकाणी चिमण्यांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडे बसविणार आहे. तसेच यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असून आपल्या घराच्या छतावर किंवा परिसरातील झाडांवर घरटे व पिण्याच्या पाण्याची भांडी लावावी. जेणेक रुन चिमण्याच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल