प्रत्येक नागरिकाने दररोज घरातल्या घरात सकाळ, संध्याकाळ नियमित व्यायाम करून स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढवावी. तसेच लिंबूवर्गीय फळांना आहारात प्राधान्य द्यावे. इतकी दक्षता घेऊनही जर कुणाला तापाची, सर्दी, खोकला जाणवला तरी तत्काळ चाचण्या करून घेणे नितांत गरजेचे आहे. जी व्यक्ती तत्काळ चाचणी करून घेते आणि अहवाल पॉझिटिव्ह असल्यास तितक्याच झटपट उपचार घेते, ती व्यक्ती लवकर बरी होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. त्यामुळे सर्वप्रथम होऊ नये, यासाठी उपाययोजना आणि त्यानंतरही जर बाधित झालाच तर तत्काळ चाचणी आणि उपचार हाच दुसऱ्या लाटेसाठीचा पर्याय आहे. आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरोना होऊ नये म्हणून माधव रसायन वटी परिणामकारक असल्याचा माझा अनुभव आहे. तसेच मेडिकल दुकानदारांनी कोणत्याही ग्राहकाला परस्पर औषधे देऊ नये. अशा प्रकारे परस्पर औषधे मिळाल्यावर नागरिक घरीच थांबून उपचार घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोरोनाच्या बाधेचे प्रमाण वाढून मग रुग्ण अत्यवस्थ होण्याची वेळ येते. त्यामुळे औषध विक्रेत्यांनी हे तत्त्व कटाक्षाने पाळायला हवे.
डॉ. श्रीपाद उपासनी
फोटो
१८ डॉ. उपासनी