लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकशाहीत जनतेच्या मतांचा सहभाग असतो, मात्र अलीकडच्या निवडणुका या जनतेचा मतांवर नव्हे तर ईव्हीएम मशीनवर जिंकल्या जात असल्यामुळे लोकशाही व्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. निवडणुकीपूर्वीच किती जागा जिंकू शकतो, असे विधान भाजपकडून केले जात असल्याने त्यांना जनतेच्या मतांपेक्षा ईव्हीएमवर विश्वास असल्याचे सिद्ध होते, असा दावादेखील मेश्राम यांनी यावेळी केला.‘बामसेफ’चे ३३वे महाराष्टÑ राज्य अधिवेशन सोमवारी (दि.१२) दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडले. यावेळी मेश्राम बोलत होते. अमरावती विभाग लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती, राष्टÑीय शीख मोर्चाचे हरविंदर सिंह खालसा, ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मारुती खैरे, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नंदा मथुरे, आंबेजोगाई मेडिकल कॉलेजचे डॉ. राजेंद्र अंकुशे, अखिल भारतीय पाथरवट समाजाचे सरचिटणीस हेमंत भोईर, डॉ. सूचित बागडे, रविराज राठोड उपस्थित होते.यावेळी मेश्राम यांनी ईव्हीएमच्या गैरप्रकाराला प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या कॉँग्रेसचादेखील छुपा पाठिंबा असल्याचा आरोप करताना ईव्हीएमचा लाभ हा भाजपा आणि कॉँग्रेसला होत असल्याचेही म्हटले. अधिवेशनाचे नियोजन नाशिकचे अॅड. सुजाता चौदांते, डॉक्टर विरोज दाणी, अक्षय अहिरे, एच. टी. फुले, सागर साळवे, भूषण पगारे, डॉ. प्रशिक धनसावंत, अविनाश पगार आदींनी केले होते. तीन सत्रांत विविध विषयांवर संवादपहिल्या सत्रात निवडणूक आयोग संविधानविरोधी कार्य करीत आहे का? २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी जनगणना व जातीनिहाय जनगणना याबाबत जनतेची मागणी व सरकारची जनविरोधी भूमिका यावर चर्चा झाली. दुपारच्या सत्रात मराठा आरक्षणाची चर्चा झाली़ सायंकाळच्या सत्रात बहुजन समाजातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या यावरही मंथन झाले़
ईव्हीएम’मुळे लोकशाही धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 1:01 AM
नाशिक : लोकशाहीत जनतेच्या मतांचा सहभाग असतो, मात्र अलीकडच्या निवडणुका या जनतेचा मतांवर नव्हे तर ईव्हीएम मशीनवर जिंकल्या जात असल्यामुळे लोकशाही व्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. निवडणुकीपूर्वीच किती जागा जिंकू शकतो, असे विधान भाजपकडून केले जात असल्याने त्यांना जनतेच्या मतांपेक्षा ईव्हीएमवर विश्वास असल्याचे सिद्ध होते, असा दावादेखील मेश्राम यांनी यावेळी केला.
ठळक मुद्देवामन मेश्राम : बामसेफच्या राष्टÑीय अधिवेशनात ईव्हीएमवर घणाघात