महापालिका कर्मचाऱ्यांना हवे २१ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:41 AM2018-10-23T00:41:25+5:302018-10-23T00:41:48+5:30
महापालिकेच्या वतीने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना चौदा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने २१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
नाशिक : महापालिकेच्या वतीने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना चौदा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने २१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. समितीच्या वतीने सफाई कामगारांची बैठक पंडित कॉलनीतील लायन्स क्लब हॉलमध्ये संपन्न झाली यावेळी ही मागणी करण्यात आली. सफाई कामगारांवर होणाºया अन्यायाच्या विरोधात लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रशासनाकडून रोज रोज नवनवीन नियम तयार करून अल्प कामगारांकडून हुकूमशाही पद्धतीने मोठ्या प्रमाणात काम करून घेतले जात असल्याचा आरोप करीत त्याचा निषेध करण्यात आला. सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. बैठकीत सुरेश दलोड, सुरेश मारू, प्रकाश अहिरे, संतोष वाघ, ताराचंद पवार, बाळासाहेब शिंदे, बबल ढकोलिया, रमेश मकवाणा, रंजित कुलकर्णी, सूरजभान डिंग्गीया, जयसिंग मकवाणा आदी उपस्थित होते.
कामगार भरती करण्याची मागणी
सफाई कामगारांकडून बेकायदेशीररीत्या एक किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा रस्ता झाडून घेणे, बांधकाम आणि उद्यान विभागाची कामे सफाई कामगारांना सांगणे यांसह अन्य कामे सांगितली जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच लाड आणि पागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांची भरती करावी, अशी मागणी करण्यात आली.