टंचाईग्रस्त गावांची प्रांतांकडून पाहणी
By Admin | Published: March 11, 2017 01:15 AM2017-03-11T01:15:25+5:302017-03-11T01:15:46+5:30
मालेगाव : तालुक्यातील सौंदाणेसह अकरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पूनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्यात पाणी सोडावे यासाठी गिरणा उजवा कालवा पाणी आरक्षण कृती समिती आक्रमक झाली आहे
मालेगाव : तालुक्यातील सौंदाणेसह अकरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पूनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्यात पाणी सोडावे यासाठी गिरणा उजवा कालवा पाणी आरक्षण कृती समिती आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अजय मोरे यांनी सौंदाणेसह टंचाईग्रस्त गावांची पाहणी करून सद्यस्थितीतील उपलब्ध जलस्रोतांचा आढावा घेतला.
टाकळी, नगाव, मांजरे, सोनज, कौळाणे, वऱ्हाणे सौंदाणे आदि गावांसाठी पूनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्याला १०५ दलघफू पाणी सोडण्याची मागणी कृती समितीकडून करण्यात आली आहे. तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती भरत पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी भेट घेतली. तसेच शुक्रवारी प्रांताधिकारी अजय मोरे यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व प्रांताधिकारी मोरे यांनी प्रशासन पाणी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करीत आहे. प्रशासनाला निर्णय घेण्यास वेळ द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. समितीनेही प्रशासनाला वेळ देण्यास संमती दर्शविली आहे.
बैठकीस सभापती पवार यांच्यासह अध्यक्ष पंकज गायकवाड, समाधान शेवाळे, कौतिक सोनवणे, शिवाजी पवार, रमेश बच्छाव, सचिव भरत पवार, नितीन निकम यांच्यासह लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)