शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; आठ जण भाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:14 AM

---- नाशिक : जुन्या नाशकातील वडाळा नाका भागात असलेल्या संजरीनगर येथील एका इमारतीत शुक्रवारी (दि.2) रात्री बारा वाजेच्या सुमारास ...

----

नाशिक : जुन्या नाशकातील वडाळा नाका भागात असलेल्या संजरीनगर येथील एका इमारतीत शुक्रवारी (दि.2) रात्री बारा वाजेच्या सुमारास अचानक घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील आठ लोक जखमी झाले असून, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ७ मध्ये राहणाऱ्या सैयद कुटुंबीयांच्या घरी शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडर बदलताना गळती होऊन स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. घरातील सिलिंडर रिकामे झाल्याने दुसरे सिलिंडर बसवित असताना रेग्युलेटर लावण्याचा प्रयत्न केला असता गॅसची वेगाने गळती होऊ लागली. सिलिंडरने पेट घेऊ नये म्हणून घरातील पुरुषांनी तो जवळच पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये फेकला. यावेळी सिलिंडरमधील गॅस अचानकपणे सर्व घरात पसरला आणि मोठा स्फोट झाला. यामुळे फ्लॅटमध्ये आगीचा मोठा भडका उडाला. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरून गेला होता.

आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत तत्काळ घरातील महिला, मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढून एका लहान टेम्पोतून जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. दोन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, पोलिसांकडून या दुर्घटनेच्या कारणाचा सूक्ष्म शोध घेतला जात आहे. यासाठी पोलिसांनी घटनास्थळी न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकालाही शनिवारी दुपारी पाचारण केले होते. या फ्लॅटमध्ये ३ रिकामे सिलिंडरदेखील आढळून आले आहेत. या दुर्घटनेची नोंद मुंबई नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

--

-इन्फो----

भाजलेल्या जखमींची नावे अशी.....

सय्यद नुसरत रहीम (२५), ६३% जळीत

शोएब वलिऊल्ला अन्सारी (२८) ९० % जळीत

मुस्कान वलिऊल्ला सय्यद (२५) ८५ % जळीत.

नसरीन नुसरद सय्यद (२५), ९५ % जळीत

सईदा शरफोद्दीन सय्यद( ४९), ९५ % जळीत

आरीफ सलिम अत्तार (५३) ०९ % जळीत

सय्यद लियाकत रहीम ( ३२) २७ % जळीत

रमजान वलिऊल्ला अन्सारी(२२), २७ % जळीत

-

-------इन्फो----

...यांची प्रकृती चिंताजनक

सईदा सैयद ही महिला आणि नसरीन सैयद ही युवती ९५ टक्के भाजली आहे तसेच शोएब अन्सारी हा युवक ९० भाजला असून या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

-----इन्फो----

सर्वत्र धावपळ अन् भीतीचे वातावरण

गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर सर्वत्र धावपळ उडाली. संजरीनगर अपार्टमेंटसह इगतपुरीवाला चाळीतील रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. द्वारका-सारडा सर्कल रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. बघ्यांची झालेली गर्दी आणि अरुंद लोकवस्तीचा परिसर यामुळे आग विझविताना जवानांना अडथळे आले. आजूबाजूच्या राहिवाशांनीसुद्धा आपापल्या घरातील सिलिंडरचे रेग्युलेटर तत्काळ बंद केले होते.