रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 09:19 PM2019-09-01T21:19:05+5:302019-09-01T21:21:43+5:30
पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक सतराची पिळकोस ते कळवण या दहा किमीच्या रस्त्याची नुकत्याच झालेल्या पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता दिवसेंदिवस एका बाजूला अधिकच खचला जात असून खड्यांचे प्रमाण हि वाढत आहे. यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून या रस्त्यावर अनेक वाहनधारकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

पंधरा दिवस झालेल्या पावसाने राज्य महामार्ग स्तरावर खड्यांचे साम्राज्य होऊन रस्ता उखडला जात असून रस्त्याची पूर्णत: चाळण झालेली असल्याने पिळकोस ते कळवण हा दहा किमीचा रडाव्या बाजूचा अर्धा रस्ता पूर्णता: एका बाजूला एक ते दीड फुट खोल खचला गेल्याने वाहनधारकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. त्यात वाह्नाचे नुकसान तर होते परंतु या कसरतीत रस्तावर किरकोळ व लहान मोठे अपघात नित्याचे घडत एकेरी अपघातही घडू लागले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी पिळकोस, जुनी बेज, नवी बेज, भादवण, बगडू या रस्त्यावरील गावातील ग्रामस्थांकडून होऊ लागली असून संबंधित बांधकाम विभागाने याकडे पुरपणे दुर्लक्ष केल्यामुळे नाहक कित्येक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
राज्य महामार्ग क्र मांक सतरा हा रस्ता ज्या वेळेस तयार झाला त्यावेळेस पिळकोस कळवण या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले. पिळकोस कळवण रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी जबाद्दार असून रस्त्याच्या कामाची विभागीय चौकशी होऊन दोषींवर दंडात्मक व कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शांताराम जाधव, राहुल सूर्यवंशी, उत्तम मोरे, राहुल आहेर, केवळ वाघ, दादाजी जाधव, सचिन वाघ, बुधा जाधव, रामदास आहेर, अभिजीत वाघ, दुर्गेश सूर्यवंशी, नानाजी मोरे, निखील जाधव, युवराज शिंदे, नंदू पवार, उत्तम बोरसे, भारत पवार, किरण सोनवणे आदींनी केली आहे.