संचारबंदीच्या अंमलबजावणीत ड्रोनद्वारे नाशिक शहरावर नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 02:26 PM2020-03-27T14:26:38+5:302020-03-27T14:40:33+5:30
एका खासगी टेक्नॉलॉजी संस्थेच्या टिमने शहरातील परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेºयांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामाध्यमातून शहरातील जूने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी सारख्या परिसरात पोलीस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दी करणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवणार आहे. या ड्रोनला पब्लीक अॅड्रेसिंग सिंस्टम त्याद्वारे गर्दीच्या ठिकाणी संचारबंदीच्या अंमलबजावणीविषयी माहितीही देणार आहेत.
नाशिक : कोरोना वायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदीचे आदेश लागू असतानाही जूने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी परिसरात अनेक नागरिक घराबाहेर पडून विनाकारण रस्त्यावर व चौकात गर्दी करीत आहेत. अशा परिसरावर नजर ठेवून नियंत्रण राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने संपूर्ण शहरावर नजर ठेवणार आहे. त्याचप्रमाणे अशा ठिकाणी गर्दी करणाऱ्या नागरिकांना संचारबंदीविषयी सुचना करून त्यांच्यावर कारावाईही करण्यात येणार असल्याची माहीती पोलीस आयुक्त विशवास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी (दि.२७) माध्यमांशी बोलताना दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात लागू असलेल्या संचारबंदीरम्यान शहरातील परिस्थीतीविषयी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी टेक्नॉलॉजी संस्थेच्या टिमने शहरातील परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेºयांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामाध्यमातून शहरातील जूने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी सारख्या परिसरात पोलीस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दी करणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवणार आहे. या ड्रोनला पब्लीक अॅड्रेसिंग सिंस्टम त्याद्वारे गर्दीच्या ठिकाणी संचारबंदीच्या अंमलबजावणीविषयी माहितीही देणार आहेत. त्यानंतरही संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या शहरात ८६ पॉईंटवर नाकाबंदी करण्यात आली असून केवळ अत्यावश्यक आरोग्यसेवा व जीवनावश्यक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगणी देण्यात आल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
आठ कॅमेरे, ६५ बीट मार्शल रस्त्यावर
संचार बंदीच्या परिस्थितीत शहरातील विविध भागावर नजर ठेवण्यासाठी शहर पोलीसांना खासगी संस्थेच्या पुढाकारातून ८ ड्रोन कॅमेरे मिळणार असून टप्प्या टप्प्याने श्हरातील सर्व १३ पोलीस ठाण्यांनाही प्रत्येकी एक याप्रमाणे १३ ड्रोन कॅमेरे उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे शहरात सुमारे ६५ बीट मार्शल व गस्तीपथकांची १६ चारचाकी वाहनेही परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नाशिक शहराची पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आली असून त्यासाठी ८६ पॉईंटवर पोलीस तैनात करण्यात अल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.