नाशिक : लोकमत नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेत शहराचे तरूण तडफदार पोलीस आयुक्त विश्वास विश्वास नांगरे पाटील हे त्यांच्या काही पोलीस सहकाऱ्यांसमवेत सहभागी झाले होते. भल्यापहाटे बोचºया थंडीत नांगरे पाटील यांनी ईदगाह मैदानावर हजेरी लावली. २१ कि.मीच्या धावपटूंना ध्वज दाखविल्यानंतर स्वत: नांगरे पाटील यांनी ‘स्टार्ट लाईन’वर येत ‘पोझिशन’ घेतली. तत्पुर्वी त्यांनी वॉर्मअप करून स्वत:ला ‘रेडी’ के ले होते. त्यांचा वॉर्मअपदेखील उपस्थित तरूण धावपटूंचे लक्ष वेधून गेला. काउन्ट डाऊन पूर्ण होताच स्टार्ट लाईनच्या घड्याळात ६:४० वाजताच नांगरे पाटील यांनी जोरदार धाव घेतली. धावताना नांगरे पाटील अन्य धावपटूंनाही हात उंचावत ‘चिअरअप’ क रताना दिसून आले. त्यांनी अवघ्या ५७ मिनिट २१ सेकंदात १० कि.मीचा रन पूर्ण करत ‘फिनिश लाईन’ गाठली.ंमहामॅरेथॉनसारख्या स्पर्धांकडे नांगरे पाटील यांचा बघण्याचा दृष्टीकोन फारच प्रेरणादायी आहे. ते म्हणतात, की या स्पर्धा माणसाच्या उर्जामापक ठरतात. त्यामुळे अशा स्पर्धांमधून नेहमीच माणसाला त्याची उर्जा किती आहे, याचा कयास बांधता येतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्यास फारसा वेळ नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे स्थुलता, थकवा, ताणतणावाचा सामना चक्क तरूणाईदेखील करताना दिसून येते. परिणामी महामॅरेथॉनसारख्या स्पर्धा प्रोत्साहन देणा-या ठरतात अन् अशा स्पर्धेत जेव्हा नांगरे पाटील यांच्यासारखे आयपीएस व्यक्तीमत्त्वाकडून सहभागी होत धाव घेतली जाते तेव्हा ती स्पर्धा तरूणाईला खूप काही शिकवून जाते, हे नाशिकच्या महामॅरेथॉनमधून नक्कीच पहावयास मिळाले.
मन में हैं ‘विश्वास’...
By अझहर शेख | Published: December 01, 2019 6:53 PM
काउन्ट डाऊन पूर्ण होताच स्टार्ट लाईनच्या घड्याळात ६:४० वाजताच नांगरे पाटील यांनी जोरदार धाव घेतली. धावताना नांगरे पाटील अन्य धावपटूंनाही हात उंचावत ‘चिअरअप’ क रताना दिसून आले.
ठळक मुद्दे ५७ मिनिट २१ सेकंदात गाठली. ‘फिनिश लाईन’६:४० वाजताच नांगरे पाटील यांनी जोरदार धाव घेतली.