शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

लसीकरण केंद्राच्या नावे बनावट 'वेब पेज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 6:43 PM

एका अज्ञात व समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तीने नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करीत सोमवारी (दि.१०) गुगलवर लसीकरणाबाबत बनावट वेब पेज तयार केले होते.

ठळक मुद्देतडीपार गुंडास अटक

नाशिक : सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्र, सिन्नरफाटा, येथे कोरोनाची प्रतिबंधक लस उपलब्ध असल्याची माहिती बनावट वेब पेजद्वारे जनसामान्यात प्रसारित केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.एका अज्ञात व समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तीने नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करीत सोमवारी (दि.१०) गुगलवर लसीकरणाबाबत बनावट वेब पेज तयार केले होते. लसीकरणाची खोटी माहिती या पेजवर प्रसारित करून जनतेची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देवराज बोरसे हे करीत आहेत.

तडीपार गुंडास अटक

नाशिक : शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरात सर्रासपणे वावरणाऱ्या एका सराईत तडिपार गुंडाला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे.

संकेत भाऊराव शिंदे (२८, रा. पांजरा चाळ, किशोर सुर्यवंशी मार्ग, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय विधाते यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत शिंदे यास दोन वर्षांसाठी उपायुक्त यांनी तडिपार केले होते. नाशिक शहर तसेच जिल्ह्यातून तडिपार केलेले आहे. असे असतानाही तो कोणतीही पूूर्वपरवानगी न घेता राहते घराच्या परिसरात हातात लोखंडी कोयता घेऊन आरडाओरड करत एकाएकाला जीवे ठार मारीन, अशा धमक्या देत दहशत पसरवत असल्याचे समजताच म्हसरूळ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस