नाशिक : शहरातील प्रसिध्द व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सुंदरलाल पारख (५२) यांनी त्यांच्या एम.जी.रोडवरील पारख इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या दुकानात आत्महत्त्या केल्याची घटना सकाळी रविवारी (दि.९) सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नेहमीप्रमाणे पारख इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान उघडण्यासाठी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांचे भाऊ पोहचले असता. दुकानामध्ये राजेंद्र पारख यांनी गळफास घेतल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी तत्काळ आजुबाजुच्या व्यावसायिकांना बोलावून त्यांच्या मदतीने त्यांना गंगापूररोडवरील एका खासगी रूग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पारख यांच्या मृत्यूची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. अत्यंत संवेदनशील मनाचे व्यक्तीमत्व असलेले राजेंद्र पारख हे सामाजिक कार्यातदेखील तितकेच अग्रेसर होते. शहरात व्यापारी वर्गात ते यशस्वी व्यावसायिक म्हणून परिचित होते. पारख इलेक्ट्रॉनिक्सचे ते संचालक होत. त्यांनी अचानकपणे असे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. कुठल्याही अपयशाला न घाबरता ते आपल्या निकटवर्तीयांना अपयशावर मात करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रोत्साहित करत असे. त्यामुळे अपयशाला न घाबरणारे असे त्यांची व्यक्तीमत्त्व होते. त्यांना सामाजिक कार्याचीही तितकीच आवड होती.पारख यांच्या निधनाचे वृत्त शहरात वेगाने पसरले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांचे मित्र परिवार, नातेवाईकांनी त्यांच्या राहत्या घरी धाव घेतली. तसेच जिल्हा रूग्णालयात त्यांचा मृतदेह आणल्यानंतर रूग्णालयाच्या आवारातही गर्दी झाली होती. पारख यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अमधाममध्ये सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने शहरातील व्यावसायिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, सून, जावई, भावजई, नातवंडे असा परिवार आहे.
प्रसिध्द व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पारख यांची आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 1:55 PM
पारख यांच्या मृत्यूची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. अत्यंत संवेदनशील मनाचे व्यक्तीमत्व असलेले राजेंद्र पारख हे सामाजिक कार्यातदेखील तितकेच अग्रेसर होते. शहरात व्यापारी वर्गात ते यशस्वी व्यावसायिक म्हणून परिचित होते.
ठळक मुद्देअपयशाला न घाबरणारे असे त्यांची व्यक्तीमत्त्व होते. सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद पार्थिवावर अमधाममध्ये सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.