नायगाव खोऱ्यात गणरायाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 06:14 PM2020-09-02T18:14:24+5:302020-09-02T18:17:15+5:30
नायगाव - सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात पुढच्या वर्षी येण्याचा नारा निनादला. सार्वजनिक मंडळांबरोबर घरघूती गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
नायगाव - सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात पुढच्या वर्षी येण्याचा नारा निनादला. सार्वजनिक मंडळांबरोबर घरघूती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव,जायगाव,देशवंडी,वडझरिे,ब्राम्हणवाडे,मोह-मोहदरी,सोनिगरी व जोगलटेंभी आदी परिसरात काल दिवसभर गणपती बप्पा मोरया सुखकर्ता दुखहर्ता व पुढच्या वर्षी लवकर या...च्या मंगलमय घोषणांनी दुमदुमून गेला होता.यंदाच्या वर्षी कोरोनामुळे सार्वजनिक मंडळांना गणपती उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली होती.त्यामुळे परिसरात यंदा सार्वजनिक ऐवजी घरघुती गणपतींची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. गेले अकरा दिवस परिसरातील गावागावात सकाळ - संध्याकाळी आरतीसह मंगलमय गितांची धुम होती.किरकोळ ठिकाणी विशेषत: गल्ली, वाडी-वस्तीवर सार्वजनिक गणपतीची स्थापना केल्याचे दिसून आले.दिवसभर नायगाव खो-यात विसर्जनाची लगबग बघायला मिळाली.दुपार नंतर गोदावरी व दारणा नदी पात्रावर घरघूती गणपती विसर्जनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.असे असले तरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकजण काळजीही घेतांना दिसत होते. यंदा नायगाव खो-यातील गावांमध्ये एकही जोरदार पाऊस पडला नसल्यामुळे सर्वच बांधारे,नदी,नाले कोरडेच आहे.त्यामुळे विसर्जनासाठी नागरिकांना गोदा-दारणा संगमावरच जावे लागले.दुपार पासून सुरू झालेला विसर्जन कार्यक्र म सांयकाळी सात वाजेपर्यंत शांततेत पार पडला.