नाशिकरोड : शिंदे येथे भूमिअभिलेख मोजणी कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलेल्या हद्दीच्या खुणा शेतात आल्या आहेत यावरून कुरापत काढून वयोवृद्ध शेतकºयास मारहाण करण्यात आली.शिंदे येथील शिवराम बाळाजी तुंगार यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, अनिल शिवराम गुंजाळ व बाळू निवृत्ती शेलार यांच्यासह आम्ही सर्व भूमिअभिलेख मोजणी कर्मचारी यांनी दाखवून दिलेल्या हद्दीत चुना टाकत होते. यावेळी संशयित चंद्रभान किसन तुंगार, तुषार चंद्रभान तुंगार, अंकुश चंद्रभान तुंगार (रा. शिंदेगाव) हे सदर ठिकाणी येऊन तुम्ही करून घेतलेली मोजणीची हद्द ही मला मान्य नाही. भूमिअभिलेख मोजणी कर्मचारी यांनी कायम केलेल्या खुणा या माझ्या शेतात आल्या आहेत अशी कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच दगड उचलून वयोवृद्ध शिवराम यांच्या डोक्यात मारून जखमी केले. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जेलरोड येथील जखमी युवकाचा मृत्यूनाशिकरोड : जेलरोड कॅनलरोड आम्रपाली झोपडपट्टी येथे सायकल स्लीप झाल्याने अनोळखी ३५ वर्षीय युवक गुरूवारी दुपारी जखमी अवस्थेत पडून होता. त्यास उपचाराकरिता जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना सायंकाळी त्याचे निधन झाले. उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.हद्दपार सराईतगुन्हेगार ताब्यातपंचवटी : परिसरात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने पोलीस उपायुक्तांनी नाशिक शहरासह जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले असतानाही सर्रासपणे पेठरोड परिसरात वास्तव्य करताना आढळून आलेल्या दिगंबर किशोर वाघ या तडीपार गुन्हेगाराला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. वाघ याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने त्याला काही दिवसांपूर्वी उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तडीपार केले होते. वाघ हा पेठरोड परिसरातील शनिमंदिराजवळ राहत असून, तो पेठरोड भागात पूर्व परवानगीशिवाय फिरताना आढळून आला. पोलीस हवालदार महेश साळुंखे हे परिसरात गस्त घालत असताना त्यांनी वाघ यास बेड्या ठोकल्या.देवळाली येथील महिलेचे दागिने लंपासदेवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प येथील रविवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यास आलेल्या महिलेच्या पर्समधील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. अनिल परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, रविवारच्या आठवडे बजारात करूणा अशोक धनतोले( रा. उल्हासनगर) या गेल्या होत्या. यावेळी करूणा धनतोले यांची चोरट्याने फाडून ४५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
किरकोळ कारणावरून शेतकऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 1:28 AM