बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:50 PM2020-01-13T12:50:54+5:302020-01-13T12:51:41+5:30
सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावर असलेल्या मानोरी शिवारातील सानपवस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी (१३) सकाळी पावनेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावर असलेल्या मानोरी शिवारातील सानपवस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी (१३) सकाळी पावनेनऊ वाजेच्या सुमारास घडली. मानोरी येथील शेतकरी राधाकिसन सहादू सानप (४८) हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर दोडी ग्रामीण रु ग्णालयात उपचार सुरु आहे. वनविभागाच्या अधिकार्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ज्वारीच्या शेतात लपलेला बिबट्या पाहण्यासाठी गेलेल्या सानप यांच्या अचानक हल्ला केला. गेल्या मंगळवारी (दि. ७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी शिवारात दारणाकाठी उसाच्या शेतात वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याची रवानगी मोहदरी वनोद्यानात करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला होता. त्यामुळे शेतकरीवर्ग शेतीच्या कामाला जाण्यास धजावत नव्हता. ग्रामस्थांच्या मागणीनंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दारणाकाठी रमेश एकनाथ कानडे यांच्या मालकीच्या उसाच्या शेत गट नंबर ६२८ मध्ये तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवारी संध्याकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान गणेश कानडे यांनी बिबट्या पिंजºयात अडकलेला पाहिला. त्यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी. के. आगळे, वनरक्षक कैलास सदगीर, बाबूराव सदगीर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.