खंडित विजपुरवठ्याने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 05:25 PM2018-10-23T17:25:32+5:302018-10-23T17:30:43+5:30
देशमाने : जळगाव (नेऊर) वीज उपकेंद्रातून मुखेड फिडरवर होणारा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून खंडित वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरण्याची शेतकऱ्यांनी तयारी केली आहे.

गत सप्ताहापासून मुखेड फिडरवर थ्री फेज सप्लाय सातत्याने खंडित होत असून खंडित वीजपुरवठा तासं-तास बंद राहत आहे. परिणामी विहिरींना असलेले अल्पपाणी देखील पिकांना देत येत नसल्याने पिके जळू लागल्याची तक्र ार शेतकरीवर्गाने केली आहे. याबाबत वीज उपकेंद्राकडे दूरध्वनीवरून संपर्क साधल्यास एकतर दूरध्वनी उचलत नाहीच, अन उचलला तर दुरुत्तरे मिळत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. केवळ ८ तास थ्रीफेज सप्लाय मिळतो, त्यातही तासो न तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा असी मागणी सरपंच विमल शिंदे, सदस्य शिवाजी शिंदे, भारत बोरसे, योगेश गांगुर्डे आदींसह शेतकरी वर्गाने केली आहे.