नुकसानीच्या अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:42 PM2020-01-23T22:42:37+5:302020-01-24T00:31:57+5:30

परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना अद्यापही अनुदान न मिळाल्याने तसेच काही शेतकर्यांचे पीक पंचनामे करूनही त्यांचे यादीत नाव समाविष्ट न केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Farmers are still deprived of the grant of damages | नुकसानीच्या अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित

नुकसानीच्या अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित

googlenewsNext

देशमाने : परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना अद्यापही अनुदान न मिळाल्याने तसेच काही शेतकर्यांचे पीक पंचनामे करूनही त्यांचे यादीत नाव समाविष्ट न केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
देशमाने (बु) येथील नुकसानग्रस्त पीक पंचनाम्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी अंबादास साळुंके यांच्यावर सोपविली होती. प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी येवला तहसील कार्यालयात यादी दिली होती. मात्र सदर यादीत अनेक चुका तर काही शेतकर्यांची नावेच नसल्याने ते शेतकरी अनुदान मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.
दरम्यान, लाखो रु पयांचे नुकसान होऊन मिळणारे तुटपुंजे अनुदान मिळविण्यासाठी सामाईक खातेदारांची संमती पत्राची जाचक अट घातल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. त्यामुळे चुकीची यादी तातडीने दुरु स्त करून तत्काळ अनुदान मिळावे अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

Web Title: Farmers are still deprived of the grant of damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.