राजापूर येथे शेतकऱ्याने साजरे केले गायीचे बारसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 09:09 PM2019-09-01T21:09:14+5:302019-09-01T21:09:41+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी संजय नामदेव चव्हाण यांनी गाईचे बारसे साजरे करीत अनोखी परंपरा जोपासली आहे. चव्हाण यांच्या गावरान गाईला सहा वेळेस वासरे झाली व सातव्यांदा गाईला गोरा झाल्याने त्यांनी चक्क गाईचे मोठ्या थाटात बारसे साजरे केले. या गायीचे निघणाºया दुधापासून त्यांनी दहा बोकड पालन केले व आपल्या उत्पन्नात भर घातली आहे.

संजय चव्हाण हे साधारण शेतकरी कुटुंबातील आहे. आतापर्यंत त्या गाईपासून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे त्यांनी बाराव्या दिवशी बारसे घातले. त्यांनी आपल्या लाडक्या गाईचे सातव्यांदा झालेल्या गोराच्या बारश्यासाठी चारशे ते पाचशे लोकांना दाळ बट्टीचे भोजन दिले, व रात्री वडगाव येथील वारकरी शिक्षण संस्थेचा भजनाचा कार्यक्रम केला.