बोगस कांदा बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 11:28 PM2021-04-07T23:28:25+5:302021-04-08T00:52:22+5:30
लोहोणेर : - देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा बियाण्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली असून, संबंधित कांदा बियाणे विक्री करणाऱ्यावर कृषी विभागाने कारवाई करून भरपाई मिळून द्यावी, अशी मागणी देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी प्रवीण निकम यांनी केली आहे.

कसमादे परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा हे नगदी पीक असून, देवळा तालुक्यातील बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मिळेल त्या ठिकाणाहून महागडे कांदा बियाणे खरेदी केले आहे. मात्र बियाणात फसवणूक झाल्याने उन्हाळी कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. घेतले उन्हाळी बियाणे व निघाले लाल, असा प्रकार घडला आहे. उन्हाळी कांद्यामध्ये डोंगळे मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, त्यात सफेद कांदा पण निघत असल्याने बियाणात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित बियाणे विक्रेते व कंपनीवर तत्काळ कारवाई करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (०७ लोहोणेर)