पीक विमा धारक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 07:01 PM2020-02-01T19:01:45+5:302020-02-01T19:03:28+5:30

मानोरी : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूही अद्याप येवला तालुक्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

Farmers holding crop insurance await compensation | पीक विमा धारक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

पीक विमा धारक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देमानोरी : तीन महिन्यानंतरही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरी : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूही अद्याप येवला तालुक्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला नाही अशा शेतकºयांना तुटपुंजी का होईना शासनाकडून मदत मिळत असून ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकºयांच्या हातात एक दमडी देखील मिळाली नसून संबंधित पीक विमा कंपनीच्या या कारभारावर शेतकरी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पीक विमा न काढलेल्या शेतकºयांना मदत मिळत असताना पीक विमा धारक शेतकरी मात्र नाराजी व्यक्त करीत आहे.
यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मका आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने लागडव केली होती. त्यात यंदा प्रथमच मक्यावर लष्करी अळीने आक्र मक केल्याने आधीच मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना वारंवार विविध प्रकारची औषध फवारणी करून काही प्रमाणात मका पीक शेतकरी वर्गाने वाचविले होते.
सन २०१८ मध्ये खरीप हंगामातील मक्याचे आणि सोयाबीनचा पण अनेक शेतकºयांनी पीक विमा काढलेला असताना कोरडा दुष्काळ पडलेला असताना देखील अद्यापही कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई पीक विमा धारक शेतकºयांना मिळालेली नाही. तसेच २०१९ मध्ये पण अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेले असताना देखील पीक विमा धारक शेतकरी नुकसान भरपाई च्या प्रतीक्षेत आहे.
काही पीक विमा धारक शेतकरी दीड वर्षांपासून तर काही शेतकरी दोन महिन्यांपासून पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून शासनाने पीक विमा संबंधित कंपन्यांना याबाबत सखोल माहितीची चौकशी करून शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या पीक विम्याची नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
लष्करी अळीचे प्रमाण वाढतच गेल्याने अनेक शेतकºयांनी मका पीक हातातून जाते की काय या भीतीने प्रधानमंत्री पीक विमा काढला होता. अवकाळी पाऊस झाल्यानंतर एका रात्रीतून पिकांची अवस्था होत्याची नव्हती झाली होती. मका, सोयाबीन पेरणीसाठी घेतलेली बियाणे, रासायनिक खते, मशागतीचा खर्च, औषध फवारणीचा हजारो रु पये खर्च करून देखील अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने हा सर्व खर्च अवकाळी पावसाने वाहून नेला होता.

येवला तालुक्यात सन २०१८ मध्ये कोरडा दुष्काळ पडला असता मका पीक पाण्याच्या कमतरतेमुळे वाया गेले होते. तेव्हा पण मी पीक विमा काढलेला होता. तसेच २०१९ मध्ये अवकाळी पावसाने मका, सोयाबीनचे नुकसान झालेले असताना तेव्हा पण मी पीक विमा काढलेला आहे. मात्र दोन्ही पण वर्षी एक रु पयांची देखील नुकसान भरपाई पीक विमा कंपनीकडून अद्याप मला मिळालेली नाही.
- विठ्ठल वावधाने, पीक विमा धारक शेतकरी.

(फोटो ०१ मानोरी, ०१ मानोरी २)
आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेले पिकांचे नुकसान.

Web Title: Farmers holding crop insurance await compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.