घोटी : अत्याधुनिक तोफांचा सराव आधिकाधिक क्षमतेने करता यावा, म्हणून देवळाली कॅम्पचा तोफखाना स्कुलने फायरिंग रेंज विस्तारण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भूसंपादनाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्याने शेतकर्यांच्या एका शिष्ठमंडळाने नुकतीच खासदार हेंमत गोडसे यांची भेट घेवून आपली कैफीयत मांडली. दरम्यान याबाबत लवकरच लष्कराच्या अधिकार्यांशी भेट घेवून याबाबत शेतकर्यांच्या हिताचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही खासदार गोडसे यांनी शेतकर्यांच्या शिष्टमंडळाला दिली.गेल्या अनेक वर्षांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकर्यांच्या जमीनी संरक्षण विभागाने अधिग्रहित केलेल्या आहेत. यामुळे शेकडो शेतकरी भूमिहिन झालेले आहेत. आता नव्याने इगतपुरी तालुक्यातील घोटी ङ्क्त सिन्नर महामार्गालगतच्या धामनगाव, गंभीरवाडी, बेलगाव या गांवामधील जवळपास 229 हेक्टर क्षेत्र फायरिंग रेज साठी भूसंपादीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याभागातील शेतकर्यांचा मुळ व्यवसाय शेती असल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुर्हाड चिन्हे तयार झाली आहेत. फायरिंग रेंजसाठी जमिनी जाणार असल्याने शेतकरी व्यथित झाले असून यातूनच आज शनिवारी शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेतली.याआधी इगतपुरी तालुक्यातील शेतकर्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर आपल्या जमिनी दिलेल्या आहेत. आता शेतकर्यांकडे मोजक्याच जमिनी शिल्लक आहेत. त्यावर कसेबसे आमचे कुटुंबाचा उदरिनर्वाह होत आहे. उरल्या सुरल्या जमिनी शासनाने जर फायरिंग रेंजसाठी घेतल्या तर शेतकरी उद्ववस्थ होईल, अशी भिती व्यक्त करीत आपल्या व्यथा गोडसे यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान याप्रकरणी मी, शेतकर्यांच्या पाठीमागे उभा असून येत्या दोन दिवसात याबाबत लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकार्यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याची ग्वाही गोडसे यांनी शिष्ठमंडळाला दिली. यावेळी नामदेव गाढवे, पांडुरंग गाढवे, नंदु गाढवे, विलास गाढवे, नामदेव घुमरे, सुनिल गाढवे. रमेश गाढवे आदी उपस्थित होते.