लोहोणेर : धाराशिव कारखाना संचलित वसाका कारखान्याला डिसेंबर-जानेवारी महिन्यात ऊस पुरवठा करून सुमारे चार महिन्याचा कालावधी उलटला असून संबधित प्रशासनाने ऊस बील अदा केले नसून सोमवारी शेतकी अधिकारी साळुंखे यांनी शेतकरी, ट्रक चालक, मालक यांना आम्हाला आपले पेमेंट घेण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर या असा दूरध्वनी करून बोलविले मात्र वसाकाची व्यवस्थापन यंत्रणाच पसार झाली असल्याने शिरपूर, अंमळनेर, शबरीधाम येथून आलेल्या शेतकरी व ट्रॅक चालक-मालक यांना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे व्यवस्थापनाच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.बंद पडलेला वसाका कारखाना व्ही.डी. पी. ग्रुपच्या धाराशिव कारखान्याने भाडे तत्वावर चालविण्यास घेतला. दि ११ नोव्हेंबर २०१८ रोजी वसाकाचा गळीत हंगाम मान्यवरांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या पांडुरंगाला व आदिमाया शक्ती सप्तशृंगी देवीला साक्षी ठेवून करण्यात आला. पंढरपूरचा विठोबा वसाकाला वाचविण्यास आला असा खोटा आभास यावेळी निर्माण करण्यात आला. मोठ्या दिलाने सभासदांनी वसाकास ऊस पुरवठाही केला. मात्र शब्दाला नजागता या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची घोर फसवणूक करण्यात आली. इतर करखान्या पेक्षा १ रु पया ज्यादा देवू ही वग्लनाही पोकळ ठरली.वसाका कार्यक्षेत्रासह गेटकेनच्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची व्यवस्थापनाने घोर फसवणूक केली. नवापूर, शहादा, शिरपूर, चाळीसगाव, पिळखोड, निफाड, आदी ठिकाणाहून ऊस गाळपास आणण्यात आला. अकरा नोव्हेबर रोजी सुरू झालेला वसाकाच्या गळीत हंगामाची चाके २२ जानेवारी रोजी थांबविण्यात आली. या कालावधीत वसाकाच्या आंत-बाहेर अनेक उलथापालथ झाली. कोणी ती जाणीव पूर्वक केली की करावयास लावली हा संशोधनाचा विषय आहे.या चक्र व्ह्यूहामध्ये खºया अर्थाने अडकला तो ऊस पुरवठादार शेतकरी व कामगार तसेच ऊस वाहतूक करणारा, व वसाकाच्या भरवशावर अवलंबून असलेला इतर घटक मात्र या घटकांकडे वसाकाच्या व्यवस्थापनाने जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले. बिल पेमेंट बाबत मात्र दिलेले धनादेश माघारी घेण्यात आले. काहींना तर चार महिन्यात रुपयाही मिळाला नाही. आज ना उद्या आपले पेमेंट मिळेल या आशेवर वाट पहाणाºयाचा जीव कासावीस होवू लागला. घेणेकरी उंबरठे झीजवू लागले आहेत. ज्याचे वसाकाकडे घेणे आहेत अशी मंडळी कार्यस्थळावर फिरकू लागल्याने वसाकाच्या व्यवस्थापनाने येथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.दरम्यान या व्यवस्थापन मंडळाने राज्य शिखर बँकेकडून सुमारे ३९ कोटींची उचलही घेतली. त्यापैकी २७ कोटी, ६२ लाख रु पये ऊस उत्पादकाची देणे दिले. त्या पैकी ९ कोटी, ७७ लाख देणे बाकी आहेत. तर ५ कोटी ९७ लाख इतर कामासाठी वापरण्यात आले. तर ८ फेब्रुवारी रोजी २ कोटी रु पये ऊस उत्पादकाना देण्यासाठी राज्य शिखर बँकेकडून उचल घेण्यात आली. या रक्कमेपोटी ऊस पुरवठादार शेतकºयांना धनादेश अदा करण्यात आले. मात्र सदर धनादेश संबधित शेतकºयाच्या खात्यावर जमा होण्याच्या आत परस्पर वळते करण्यात आले.आपली रक्कम मिळावी म्हणून सोमवारी (दि.१५) सुधाकर शिसोळे, मनूलाल शिसोळे, विलास पाटील आदी शेतकरी वसाका कार्यस्थळावर मुख्य शेतकी अधिकारी साळूखे यांनी आर टी जी एस करण्यासाठो आपले आधारकार्ड व पासबुकची झेरॉक्स घेवुन या प्रमाणे केलेल्या दूरध्वनी नुसार उपस्थित झाले होते.मात्र या शेतकºयांना व्यवस्थापन मंडळाचा एक ही अधिकारी अथवा प्रतिनिधी न भेटल्याने व सबधितांनी यांचा दूरध्वनी न उचलल्याचे हतबल व्हावे लागले. यावरून वसाका कारभाराबाबत निश्चितपणे किती दडपशाही चालू आहे, हे जरी स्पस्ट होतअसले तरी या दडपशाहीचा आगामी लोकसभा निवडणुकीत निश्चित परिणाम जाणवेल याची लोकप्रतिनिधी नी दखल घेणे गरजेचे आहे. अशीच चर्चा सध्या तरी वसाका कार्यस्थळावर चालू आहे.चौकट : वसाका ला ऊस पुरवठा करून आमची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. अध्याप ऊस बिल न मिळाल्याने घेणे करी सतावत आहेत. घरी येऊन नको ती भाषा वापरीत आहेत. आता आमचे बिल न मिळाल्यास आम्ही वसाकाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्या करण्याच्या विचारात आहोत, याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.- अनिता विलास पाटील,पत्नी, ऊस पुरवठादार शेतकरी, रा. जापोरा ता. शिरपूर.वसाकाला डिसेंबर-जानेवारी मिहन्यात सुमारे ३०० मे.टन ऊस पुरवठा केला. मात्र त्याचे पेमेंट अद्याप मिळाले नाही. आज शेतकी अधिकारी साळूखे यांचा फोन आल्याने कारखाना कार्यस्थळावर पेमेंट घेण्यासाठी आलो. मात्र या ठिकणी एकही अधिकारी किंवा जबाबदार प्रतिनिधी उपस्थित नसल्याने आमची निराशा झाली असल्याचे आमचे म्हणणे असून व्यवस्थापन मंडळाने आमची घोर फसवणुक केली आहे.- सुधाकर शिसोळे ( रा. प्र.डांगरी, ता.अमळनेर)
वसाका कार्यस्थळावरुन शेतकरी रिकाम्या हाताने परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 5:44 PM
लोहोणेर : धाराशिव कारखाना संचलित वसाका कारखान्याला डिसेंबर-जानेवारी महिन्यात ऊस पुरवठा करून सुमारे चार महिन्याचा कालावधी उलटला असून संबधित प्रशासनाने ऊस बील अदा केले नसून सोमवारी शेतकी अधिकारी साळुंखे यांनी शेतकरी, ट्रक चालक, मालक यांना आम्हाला आपले पेमेंट घेण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर या असा दूरध्वनी करून बोलविले मात्र वसाकाची व्यवस्थापन यंत्रणाच पसार झाली असल्याने शिरपूर, अंमळनेर, शबरीधाम येथून आलेल्या शेतकरी व ट्रॅक चालक-मालक यांना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे व्यवस्थापनाच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ठळक मुद्देलोहोणेर : व्यवस्थापन यंत्रणाच पसार झाली ; ट्रक चालक-मालक तीव्र नाराज