राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरून राजाचे समाधानकारक आगमन झाले नसल्याने गावापासून पुर्वकडील वडपाटी भागातील शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या झाल्या नसल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे.गेल्या बराच दिवसापासून पावसाने ओढ लावल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात असून कधी वरूनराजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहे. येथे मागील वषी दुष्काळी परिस्थिती भयानक असताना यावर्षी अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबून पडल्या आहेत.राजापूर येथे सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा या चिंतेने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पेरण्या करण्यासाठी पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. मागे काही दिवसापूर्वी थोड्याफार झालेल्या पावसावर काही भागातील शेतकऱ्यांनी मका, मुग, बाजरी, भुईमूग, कपाशी आदींच्या पेरण्या केल्या, मात्र आता ती उगवत असताना पाऊसाची नितांत गरज आहे. पण वरून राजा रूसलेलाच आहे.राजापूर गावात निम्या पेरण्या झाल्या आहे. पण सध्या त्या पेरण्या करूनही उपयोग होतो कि नाही अशा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा आहे.त्यामुळे शेतात पिके सुकून जाते कि काय या संकटात शेतकरी सापडले आहे.त्यामुळे बळीराजासह शेतमजूर वर्ग यांच्या नजरा वरूनराजाच्या आगमनाकडे लागून आहेत. मात्र खरिप हंगामासाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने या पावसाच्या आगमनकडे बळीराजाच्या नजरा लागून आहे. गेल्या वर्षी जुन महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सुरू आहेत. या गावाला कितीही पाऊस झाला तरी दरवर्षी उन्हाळ्यातील चार महिने हे या गावाला टॅकरवर तहान भागावी लागते. पण मागच्या वषीॅ शेतकरी वर्गाने केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. .दीड महिना उलटूनही राजापूर येथे चांगला पाऊस झाला नसल्याने राजापूर व परिसरात सध्या काही भागात पेरण्या झाल्या आहेत. तर अजूनही वडपाटी कडील शेतकºयांच्या पेरण्या झाल्या नाही. मागील वषी केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले असल्याने शेतकºयांची चिंता वाढत आहे.- दत्तात्रय सानप, शेतकरी, राजापूर.
पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 7:16 PM
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरून राजाचे समाधानकारक आगमन झाले नसल्याने गावापासून पुर्वकडील वडपाटी भागातील शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या झाल्या नसल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे.
ठळक मुद्देराजापूर : पुर्वकडील भागात अद्याप पेरण्याच नाही झाल्या