तालिम संघाच्या वतीने घोटीत पहिलवानांना खुराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 03:36 PM2020-08-08T15:36:20+5:302020-08-08T15:36:45+5:30
घोटी : तालुक्यातील नामवंत पहिलवान लाल माती ते अत्याधुनिक मॅटचा प्रवास करत तालुक्याचा नावलौकिक वाढवत आहेत. आज आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना पुढे जाता येत नाही म्हणूनच इगतपुरी तालुक्यातील पहिलवांनाना कसरती बरोबर खुराक कमी पडू नये म्हणून तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे यांच्यावतीने पहिलवानी खुराक वाटप करण्यात आला.

टाके येथील आयोजित कार्यक्र मात शेकडो पहिलवांनाना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते खुराक वाटप करण्यात आला.
तालुक्यात क्र ीडा संकुलासह भव्य तालीम उभारू अशी ग्वाही आमदार खोसकर यांनी याप्रसंगी दिली.
या कार्यक्र मास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके, प्रशांत कडू, रघुनाथ तोकडे यांच्यासह मोठ्या संख्येने पहिलवान उपस्थित होते.