खते तपासणीत अधिकारी ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:54 AM2017-11-04T00:54:48+5:302017-11-04T00:54:48+5:30

कीटकनाशके फवारणीवरून खते व कीटकनाशके विक्रेत्यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मात्र त्यांची ही दुकाने तपासणीची कारवाई या धाकामुळेच ‘आस्ते-कदम’ सुरू ठेवल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते, बियाणे व कीटकनाशके विक्री केंद्रांच्या तपासणीचे लक्ष्य सरासरी ५५ ते ५८ टक्केच राहिल्याची धक्कादायक माहिती समोेर आली आहे.

Fertilizer investigating officer 'no' | खते तपासणीत अधिकारी ‘नापास’

खते तपासणीत अधिकारी ‘नापास’

Next

नाशिक : कीटकनाशके फवारणीवरून खते व कीटकनाशके विक्रेत्यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मात्र त्यांची ही दुकाने तपासणीची कारवाई या धाकामुळेच ‘आस्ते-कदम’ सुरू ठेवल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते, बियाणे व कीटकनाशके विक्री केंद्रांच्या तपासणीचे लक्ष्य सरासरी ५५ ते ५८ टक्केच राहिल्याची धक्कादायक माहिती समोेर आली आहे.
कृषी आयुक्तांची खरीप हंगाम २०१७ आढावा व रब्बी हंगाम २०१७-१८ नियोजनाबाबत बैठक असून, त्यानिमित्ताने कृषी विभागाने केलेल्या संक्षिप्त माहितीतून हे वास्तव उघड झाल्याचे कळते. जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह पंचायत समिती कृषी अधिकाºयांना निरीक्षकनिहाय दरमहा खते, बियाणे व कीटकनाशके केंद्रे तपासणीचे लक्ष्य दिलेले असते. त्यानुसार ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते विक्री केंद्रांचे २०६८ केंद्रे तपासणीचे लक्ष्य असताना प्रत्यक्षात ९७६ (४७ टक्के) खते विक्री केंद्रांची तपासणी झाल्याचे समजते. तसेच बियाणे विक्री केंद्रे तपासणीचे १५२४ लक्ष्य असताना प्रत्यक्षात ८८५ (५८ टक्के) बियाणे विक्री केंद्रांचीच तपासणी करण्यात आल्याचे कळते. इतकेच नव्हे तर ज्या कीटकनाशके फवारणीवरून रणकंदन सुरू आहे त्या कीटकनाशके विक्री केंद्र तपासणीचे १४८३ उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ८२० कीटकनाशके विक्री केंद्रांचीच तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Fertilizer investigating officer 'no'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.