शेतकऱ्यांकडून शेतातच मळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 08:51 PM2020-11-04T20:51:09+5:302020-11-05T02:33:40+5:30
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी दिवसेंदिवस अवगत तंत्रज्ञान तसेच पारंपरिक पद्धतीला फाटा देत आहे.माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल यूगाची कास धरत शेतीत बदल करू लागले आहेत.
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी दिवसेंदिवस अवगत तंत्रज्ञान तसेच पारंपरिक पद्धतीला फाटा देत आहे.माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल यूगाची कास धरत शेतीत बदल करू लागले आहेत.
नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून उत्पादन वाढीकडे कल झुकवीत असुन शेती उत्पादकतेमधुन लाखोंचे उत्पादन आणि नसीब आजमवत आहे.गव्हु, बाजरी,ज्वारी पिकांबरोबर च नगदि पिके कोथिंबीर, भोपळा,कोंबी, फुलावर बरोबर मका, सोयाबीन भुईमूग सारख्या पिके करून लाखोंचे उत्पादन पदरी पाडून घेण्याकडे कल आहे.
एकीकडे नवीन तंत्रज्ञान तर दुसरीकडे नामशेष होत चाललेली पारंपारिक शेतीपद्धती दिसून येत आहे. याचाच प्रत्येक शेती पद्धती तील साठवणूक करणारी शेतखळे हे एक होय. मात्र तंत्रज्ञान शेती अवजारामुळे पारंपरिक खळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
पुर्वी शेतकरी गावाच्या शिवारात अथवा शेताच्या कडेला एक गोल आकाराचे खळे पाणी शिंपुन त्यावर दोन चार बैलाच्या जोडीची गोल फिरवून खळे तूडवून मग ते शेणाने शेतकऱ्याची बायको सारवत असे त्या खळ्यावर शेतात पिकलेली बाजरी सोंगणी करून खळ्यावर सूडी रचुन ठेवत काम नाही त्यावेळी बाजरी सावडिने बायकांना बोलावून बाजरीचे कनस मोडत असे.मग कणसावर बैलाची पात हाकून दिवसभर कनसे मळून, महिला खळ्यातच तिवहिवर किंवा टिपावर उभी राहून बाजरी उपनून तयार करत असत.
मात्र तंत्रज्ञानाच्या अवगत शेती अवजारामुळे शेतातच शेताच्या कडेला किंवा घरापुढे मोठा प्लॉस्टीकचा कागद आनून त्यावरच धान्य काढणीचे उपनेर आनून तासाभरात बाजरि असो कि गहू तयार होतात. त्यामुळे खळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर दिवसेनदिवस पारंपरिक पद्धतीने शेती कडे दुर्लक्ष होत आहे तर अवगत शेती मुळे मजुर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.यात्रीकिकरणा मुळे आता मजूर वर्ग हि कमी लागत आहे.